Monday, July 1, 2024

‘या’ बड्या नेत्यांच्या पत्नीचा फोन आला आणि…अभिनेते किरण माने यांनी शेअर केला ‘तो’ अनुभव

एका मालिकेसोबत वाद झाला आणि अचानक मराठी मनोरंजनविश्वात किरण माने हे नाव प्रसिद्ध झाले. किरण माने यांना त्यांच्या त्या विशिष्ट वादामुळे मोठ्या प्रमणावर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ते मराठी बिग बॉसमध्ये देखील झळकले. या शोमध्ये त्यांच्या लोकप्रियतेत अधिकच वाढ झाली सोबतच त्यांना तुफान प्रसिद्धी देखील मिळाली. सोशल मीडियावरही किरण माने यांचा वावर खूपच चांगला आहे. ते सतत सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत लाइमलाइट मिळवत असतात. आता पुन्हा एकदा किरण माने त्यांच्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहे.

किरण माने यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी फोन केला आणि त्यांना एका कार्यक्रमाचे आमंत्रण दिले. याबाबत किरण माने याने एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. किरण माने यांनी त्यांच्या सत्काराचा एक फोटो पोस्ट करत लिहिले, “किरणजी, मी बारामतीहून सुनेत्रा पवार बोलतीये. यावर्षी आमच्या फोरमच्या वर्धापनदिनादिवशी तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून यावं अशी आम्हा सर्वांची मनापासून इच्छा आहे.” फोरमचं काम मला माहित होतं. त्यामुळे एका क्षणात होकार दिला.

…अजितदादांच्या पत्नी सुनेत्रावहिनींनी बारामतीमध्ये एनव्हायरमेन्टल फोरमच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जागृतीचं अफाट काम केलंय! एखाद्या राजकीय नेत्याच्या कुटूंबियांनी पदाचा, अधिकारांचा, आर्थिक सबलतेचा, जनाधाराचा, सामाजिक प्रतिष्ठेचा वापर समाजोपयोगी कामांसाठी कसा करावा, याचं उत्तम उदाहरण आहे हे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

पुढे किरण माने यांनी सुनेत्रा पवार यांचे कौतुक करताना लिहिले, “कार्यक्रमादिवशी संवाद साधताना वहिनींचा निसर्ग, प्राणी, पक्षी, झाडं यावरचा सखोल अभ्यास पाहून मी अक्षरश: थक्क झालो! पर्यावरणशास्त्र, हवामानबदल, प्रदूषण, प्राणी-पक्षी याबद्दल सर्वांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये अवेअरनेस यावा यासाठी त्या अथक परीश्रम घेतात. हल्ली मोबाईल गेम्समध्ये अडकलेल्या लहान मुलांना खुल्या मैदानात आणून लगोरी, सूरपारंब्या, गोट्या, विटीदांडू अशा अनेक लुप्त होत चाललेल्या खेळांच्या स्पर्धाही भरवल्या जातात. आजच्या बदललेल्या जीवनशैलीत खूप मोलाचं काम आहे हे. काल पर्यावरणप्रेमी अनुज खरे यांना ‘वसुंधरा पुरस्कार’ आणि विविध क्षेत्रात जगभर नांव कमावणार्‍या निवडक बारामतीकरांना ‘बारामती आयकॉन’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं.

बारामती हे माझं जन्मगांव. कोर्‍हाळे बुद्रुक माझं आजोळ. माझ्यावर निरपेक्ष आणि अतोनात प्रेम करणारे, कुठल्याही संकटात माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणारे माझे मामा तानाजीबापू, नंदूआबा, तात्या आणि कुटुंबीय…सन्मित्र नितिन यादव, महादेव बालुगडे, अमोल काटे, अमर महाडिक…असे अनेक ‘जिवातले गणगोत’ बारामतीनं मला दिले. अशा भूमीत, अशा समाजभान जपणार्‍या कार्यक्रमात, आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रीत करावं यासारखा दुसरा आनंद नाही. याप्रसंगी माझ्या माणसांच्या नजरेत दिसलेलं कौतुक आणि अभिमान, ही माझी यापुढच्या संघर्षातली शिदोरी आहे…”

किरण माने यांच्या या पोस्टवर नेटकाऱ्यानी देखील कमेंट्स करत त्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान किरण माने लवकरच एका सिनेमात दिसणार असून, सध्या या सिनेमाचे गोव्यामध्ये शूटिंग सुरु आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी पैसा गमावला आहे’ नेटवर्थच्या प्रश्नावर हे काय बोलला कपिल शर्मा, ऐकून विश्वास बसणार नाही
Bhabiji Ghar Par Hai : मालिकेने गाठला मोठा टप्पा, कलाकारांनी प्रेक्षकांचे हात जोडून मानले आभार

हे देखील वाचा