Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड बॉलिवूड मध्ये गाजत असत बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्ट्या; हे कलाकार राहायचे कायम हजर…

बॉलिवूड मध्ये गाजत असत बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्ट्या; हे कलाकार राहायचे कायम हजर…

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दिवंगत नेत्याच्या निधनामुळे राजकारणापासून बॉलिवूडपर्यंत शोककळा पसरली आहे. राजकारण जगतातील बाबा सिद्दीकी यांचे बॉलिवूडशीही चांगले संबंध होते. दरवर्षी ते मुंबईत एका भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करायचे ज्यात राजकारणी आणि चित्रपट कलाकार उपस्थित असायचे.

बाबा सिद्दीकी यांना मुंबईतील ग्रँड इफ्तार पार्टीचे आयकॉन म्हटले जायचे. बॉलीवूड स्टार्स आणि राजकारण्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांच्या पार्टीला हजेरी लावली होती. टीव्ही स्टार्सपासून कॉमेडियनपर्यंत त्यांच्या शाही मेजवानीचा भाग असायचे. बाबा सिद्दीकी त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकीसोबत या इफ्तार पार्टीचे आयोजन करत होते.

शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी, प्रीती झिंटा, कतरिना कैफ यांच्यासह असंख्य मोठे स्टार्स बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते. बाबा सिद्दीकी यांनी शेवटची 24 मार्च 2024 रोजी भव्य इफ्तार पार्टी आयोजित केली होती. यात केवळ चित्रपट कलाकारच नाही तर छोट्या पडद्यावरील हिना खान, गौहर खान, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, रश्मी देसाई, मोनालिसा, अली गोनी आणि कॉमेडियन मुनावर फारुकी यांनी सहभाग घेतला होता.

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या गोळ्या झाडल्याची बातमी समजताच राजकारण्यांपासून ते चित्रपटसृष्टीतील व्यक्तींपर्यंत सर्वजण लीलावती रुग्णालयात पोहोचू लागले. या कठीण काळात सलमान खान, संजय दत्त आणि शिल्पा शेट्टीसह अनेक स्टार्स बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबासोबत दिसले.

बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. बाबा सिद्दीकी यांचा मृतदेह रविवारी (१३ ऑक्टोबर) सकाळी पोस्टमॉर्टमसाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला. आज सायंकाळी ७ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

कसा शूट झाला ॲनिमलचा तो सीन ? तृप्ती दिमरीने सांगितला संपूर्ण किस्सा…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा