नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन झाले आहे. यामुळे वडिलांची आठवण करून, तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
नीलम कोठारीने रविवारी (१४ नोव्हेंबर) रोजी सोशल मीडियावर ही माहिती दिली. तिच्या वडिलांचे नाव सुशील कोठारी असे होते. या माहितीसोबत तिने वडिलांसोबतचा एक गोड फोटो शेअर केला असून, एक भावनिक नोट लिहिली आहे. या नोटमध्ये तिने लिहिले आहे की, “माझे प्रिय बाबा, तुम्ही माझा प्रकाश होते, तुम्ही माझी शक्ती होते. माझे समर्थक होते. माझे मित्र होते. मला तुमची खूप आठवण येईल. मी तुमच्यावर प्रेम करते. तुमच्या आत्म्याला शांती लाभो.” (neelam kothari father died celebs like maheep kapoor seema khan and bhavana panday offer condolences)
नीलमचे पती आणि अभिनेता समीर सोनी यानेही सासऱ्यांच्या आठवणीत एक भावनिक नोट लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे, “तुमच्या आत्म्याला शांती लाभो अंकल, तुम्ही तुमचे आयुष्य किंग साइज जगले आहे. तुमची खूप आठवण येईल.” नीलमच्या व समीरच्या या पोस्टवर तिचे मित्र आणि चाहते श्रद्धांजली वाहत आहेत. तसेच यावर जुही चावलानेही श्रद्धांजली वाहिली आहे.
यावर सोफी चौधरीने लिहिले की, “वडिलांचे निधन दुर्दैवी आहे. मी तुम्हाला प्रेम आणि शक्ती पाठवत आहे. वडिलांच्या आत्म्याला शांती लाभो.” शिवाय महीप कपूर, सीमा कपूर आणि भावना पांडे यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. महीप कपूरचे पती संजय कपूर आणि भावनाचे पती चंकी पांडे यांनीही सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. चाहत्यांनीही नीलमच्या वडिलांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
नीलम कोठारीने अभिनेता समीर सोनीसोबत लग्न केले होते. दोघांनाही एक मुलगी आहे. नीलमने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिचे वडील सुधीर कोठारी हे ज्वेलरी उद्योगातील व्यावसायिक होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फाटक्या स्टाईलचे कपडे घालून लोकांसमोर आली उर्फी जावेद, ड्रेस पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे
-अर्रर्र, हे काय झालं! शाहिद कपूरच्या पत्नीच्या चेहऱ्यावर दिसले किडे, व्हिडिओ जोरदार व्हायरल