Wednesday, July 3, 2024

कपिल शर्माच्या प्रश्नावर नीना गुप्ता यांनी दिलं ‘असं’ नॉनव्हेज उत्तर, की कॉमेडियनलाही वाटली लाज!

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. आपले म्हणणे मांडण्यासाठी त्या कोणत्याही प्रसंगाची आणि वेळेची वाट पाहत नाही. मनात जे येईल ते त्या लगेच बोलते. पण अभिनेत्रीचे असे बिनधास्त असणे कधी-कधी आजूबाजूच्या लोकांसाठी अडचण बनते आणि असाच प्रकार त्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) पोहोचल्यावर घडला. त्यांनी कपिल शर्माच्या (Kapil Sharma) प्रश्नाला असे उत्तर दिले की, सगळेच अवाक् झाले.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता, त्यांचे म्हणणे अगदी बिनधास्तपणे मांडतात, मग त्याचा परिणाम काहीही असो. कोणाला काही वाटले, तरी त्या याकडे लक्ष देत नाहीत. तुम्ही त्यांच्या आयुष्याचे पुस्तक पाहा, यात तुम्ही बघू शकता की, त्यांनी कशाप्रकारे संपूर्ण समाजाशी लढा देऊन लग्न न करताच मुलीला जन्म दिला. प्रदीर्घ गॅपनंतर त्यांनी गजराज रावसोबतच्या ‘बधाई हो’ या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडले. त्यानंतर त्या अनेक चित्रपटांमध्ये दिसल्या. (neena gupta double meaning answer in kapil sharma show)

प्रश्नाचे दिले डबल मिनिंग उत्तर!
नीना गुप्ता, कंगना रणौतसोबत (Kangana Ranaut) ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘पंगा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेल्या होत्या. यादरम्यान त्यांनी कपिलच्या एका प्रश्नाला इतके चोख उत्तर दिले होते की, ते व्हायरल झाले होते. कपिलने नीना गुप्ताला विचारले, “तुमच्याबद्दल अफवा आहे की, तुम्हाला हॉलिवूड सीरिज बेवॉच पॉमेला ऍंडरसनची भूमिका करायची आहे. यावर नीना यांनी असे उत्तर दिले, जे ऐकून तेथे उपस्थित सर्व लोटपोट झाले. नीना म्हणाल्या की, “माझ्याकडे पॉमेलासारखे मोठे बुब्स नाहीत, जे मी काम करू शकेल.”

कपिललाही वाटली लाज!
हे उत्तर ऐकून कपिल सुद्धा लाजतो आणि म्हणतो की, “काही व्हेज उत्तर द्या!” यावर नीना म्हणतात की, “प्रश्नच नॉनव्हेज विचारलाय, तर मग उत्तर व्हेज कसे असेल.”

तसेच, नीना गुप्ता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चेत राहिल्या आहेत. सर्वप्रथम नीना गुप्ता यांचे हृदय ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर आले. माध्यमातील वृत्तानुसार, नीना गुप्ता आणि आलोक नाथ ८० च्या दशकात रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, हे नाते फार काळ टिकू शकले नाही.

हेही नक्की वाचा –

हे देखील वाचा