Thursday, March 12, 2026
Home बॉलीवूड प्रेग्नेंट असताना नीना गुप्ता यांच्यावर ओढावल होतं आर्थिक संकट, म्हणाल्या की फक्त माझ्याकडे दोन हजार रुपये होते

प्रेग्नेंट असताना नीना गुप्ता यांच्यावर ओढावल होतं आर्थिक संकट, म्हणाल्या की फक्त माझ्याकडे दोन हजार रुपये होते

नीना गुप्ता बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे जिने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर केले तर सिनेसृष्टीमध्ये बऱ्याच वर्षापासून ही अभिनेत्री सक्रिय आहे. नीना गुप्ता हे आता 66 व्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत.अलिकडेच, “वध 2” मधील भूमिकेमुळे त्या चर्चेत आल्या. त्यांचे व्यावसायिक आयुष्य जेवढे चर्चेत राहिले, वैयक्तिक आयुष्यही तेवढेच चर्चेत राहिले, अविवाहित असूनही, 1989 मध्ये नीना गुप्ता गर्भवती असल्याचे कळल्यानंतर त्यांचे खाजगी आयुष्य खूप चर्चेचा विषय बनले. मात्र या कठीन प्रसांमुळे न खचता नीना गुप्ताने तिच्या मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. “सच कहूं तो” या त्यांच्या आत्मचरित्रात नीना गुप्ताने खुलासा केला आहे की मसाबाच्या जन्माच्या वेळी तिच्या बँक खात्यात फक्त 2000 रुपये होते.

नीना (Nina)गुप्ता यांच्या पुस्तकातील म्हटले की, माझी प्रसूतीची तारीख जवळ येत असताना, मला काळजी वाटू लागली कारण माझ्या खात्यात खूप कमी पैसे होते. मी सामान्य प्रसूती करू शकले असते, कारण त्यासाठी फक्त 2000 खर्च आला असता. पण मला माहित होते की जर मला सी-सेक्शन करावे लागले असते तर.., कारण शस्त्रक्रियेसाठी 10000 खर्च आला असता. सुदैवाने, मला प्रसूतीच्या काही दिवस आधी 9000 ची परतफेड मिळाली आणि शेवटी, माझ्या बँक खात्यात 12000 जमा झाले.

तर पुढे स्पष्ट केले की, “मला हे पैसे मिळाल्याचा मला आनंद झाला, कारण माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले होते की मला सी-सेक्शन करावे लागेल. त्यावेळी माझ्यासोबत असलेले माझे वडील खूप रागावले होते. त्यांनी सांगितले की हे आमच्याकडून अधिक पैसे उकळण्यासाठी एक युक्ती आहे का तु. 2012 मध्ये, मसाबा गुप्ताने देखील यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली. तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर लिहिले, “मी जन्माला आलो तेव्हा माझ्या आईच्या बँक खात्यात फक्त 2000 रुपये होते. वेळेवर परतफेड झाल्यामुळे ही रक्कम 12000 रुपयांपर्यंत वाढली आणि अर्थातच, माझा जन्म सी-सेक्शनद्वारे झाला. माझ्या आईचे चरित्र वाचून मला खूप काही शिकायला मिळाले आणि तिने कोणत्या अडचणींना तोंड दिले हे देखील कळले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

हंसिका मोटवानीचे लग्न का तुटले? घटस्फोटाच्या कागदपत्रांनी उघड केली अनेक गुपिते

हे देखील वाचा