Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड शूटिंगदरम्यान बिघडली प्रकृती अन् नीना गुप्तांचे एमआरआय!

शूटिंगदरम्यान बिघडली प्रकृती अन् नीना गुप्तांचे एमआरआय!

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये ‘गांधी’, ‘वो छोकरी’, ‘बधाई हो’, ‘सांस’, ‘यात्रा’, ‘कमजोर कड़ी कौन’ यांचा समावेश आहे. टीव्ही आणि चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी ओटीटीसाठीवरही काम केले. ‘पंचायत’ या कॉमेडी-ड्रामामध्ये आपल्या अभिनयाने त्यांनी लाखो प्रेक्षकांची मने जिंकली.

आपल्या करिअरमधील काही कठीण दिवसांची आठवण करून देताना नीना गुप्ता म्हणाल्या, “मी ‘कमजोर कडी कौन’ हा टीव्ही शो होस्ट केला होता. जेव्हा मला या शोची ऑफर मिळाली, तेव्हा मी थोडासा संकोच केला. मी महिनाभरापूर्वीच या शोसाठी सराव सुरू केला होता. शोचे काही नियम होते, जे मला पाळायचे होते, जसे की मला फक्त काळा ड्रेस घालायचा होता. तसेच रिहर्सलमुळे माझ्या तब्येतीवर परिणाम झाला होता. एके दिवशी माझी प्रकृती खूप बिघडली. शूटिंगनंतर लगेचच मला एमआरआयसाठी जावे लागले.” (neena gupta had to go for an mri after shooting for kamjor kadi kaun)

नीना पुढे म्हणाल्या, “सर्व प्रयत्न करूनही प्रेक्षकांना हा शो फारसा आवडला नाही. हा शो फ्लॉप ठरला.” नीना यांनी सांगितले की, त्यांनी १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या कॉमेडी चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील काही बड्या व्यक्तींसोबत काम केले होते. ‘जाने भी दो यारो’ मधील अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, “आम्ही जेव्हा त्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली, तेव्हा आम्ही नाटकाप्रमाणे त्याची रिहर्सल करायचो. रवी वासवानीसोबत माझा एक सीन होता, मात्र तो सीन चित्रपटाच्या लांबीमुळे कापला गेला. हा चित्रपट करताना खूप मजा आली.”

नीना गुप्ता ‘पंचायत’सोबत प्राइम व्हिडिओवर येणार आहे, तर त्यांची मुलगी मसाबा गुप्ताही ‘मॉडर्न लव्ह: मुंबई’सोबत प्राइम व्हिडिओवर धमाल करणार आहे. नीना गुप्ता म्हणतात, “प्रेक्षकांच्या प्रेमाची मी सदैव ऋणी राहीन. जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला जाणवते की चाहत्यांनी मला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली आहे. टीव्ही ते चित्रपट हा प्रवास त्यांच्या प्रेमामुळेच पूर्ण झाला आहे. मी देवाचा खरोखर आभारी आहे.” आता अभिनेत्रीच्या ‘पंचायत’ला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा