Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ‘वडिलांनाच मानले होते बॉयफ्रेंड’, नीना गुप्ता यांनी केला वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा

‘वडिलांनाच मानले होते बॉयफ्रेंड’, नीना गुप्ता यांनी केला वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या केवळ अभिनयासाठी नाही, तर त्यांच्या आकर्षक अंदाजासाठीही ओळखल्या जातात. नीना या प्रत्येक विषयावर आपले मत उघडपणे व्यक्त करत असतात. ज्यात विशेषत: लग्न, करिअर, मुलांचे आणि स्त्रियांचे हक्क सारख्या अनेक बाबींचा समावेश आहे.

आजच्या काळात काही गोष्टी ज्या अद्यापही समाजासाठी अतिशय आधुनिक मानल्या जातात, ते निना यांच्यासाठी सामान्य आहे. नीना यांच्या आयुष्यात त्यांना जे उचित वाटेल तेच त्यांना करायला आवडते. याशिवाय नीना देखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी लाईमलाईटचा एक भाग राहिल्या आहेत. नीना बर्‍याचदा आपल्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाचे खुलासे करत असतात. अलीकडेच नीना ‘सरदार का ग्रँडसन’ या चित्रपटात दिसल्या असून, या चित्रपटात त्यांच्या व्यक्तिरेखेची जोरदार प्रशंसा केली जात आहे. यानंतर नीना या एकामागून एक मुलाखती देत ​​आहेत. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या एकाकीपणाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

नीना गुप्ता यांनी एका आरजेला दिलेल्या मुलाखतीत, आपल्या एकाकीपणाच्या संघर्षाचे वर्णन केले आहे. असे सांगितले की, आयुष्यात त्यांना अनेकदा एकटे वाटले आहे. त्यांचा प्रियकर किंवा पती नसल्यामुळे त्यांनी बर्‍याच वर्षांपासून या गोष्टीचा सामना केला आहे. तसेच नीना म्हणाल्या की, ‘मी भूतकाळाकडे लक्ष देत नाही म्हणून, मी एकाकीपणावर मात करू शकली आहे.’

या मुलाखतीत नीना त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त, आपल्या वैयक्तिक जीवनासंदर्भात अनेक विषयांवर उघडपणे बोलल्या आहे. आयुष्यातील एकाकीपणाबद्दल बोलताना नीना म्हणाल्या, ‘माझ्या आयुष्यात असं अनेक वेळा घडलं. कारण बर्‍याच वर्षांपर्यंत माझा ना प्रियकर होता, किंवा पतीही नव्हता. खरे सांगायचे, तर माझे वडील माझे प्रियकर होते. हे तेव्हा झाले जेव्हा कामावर माझा अपमान होत असे. मला बर्‍याचदा एकटेपणा वाटला आहे, परंतु मी नेहमीच पुढे जाण्यास सक्षम आहे, याची देवाने मला शक्ती दिली आहे. मी भूतकाळाकडे लक्ष देत नाही.’

नीना या वेस्ट इंडिजचे क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये होत्या, ज्यांच्यामुळे त्यांना मुलगी मसाबा गुप्ता आहे. व्हिव्हियन आणि नीना यांचे नाते फार काळ टिकले नाही, आणि त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर नीना यांचे विवेक मेहरांशी लग्न झाले आहे.

नुकत्याच झालेल्या मुलाखतीत नीना यांनी उघड केले की, ती गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमध्ये, पती विवेकसमवेत त्या मुक्तेश्वर येथे सहा महिने राहिल्या होत्या. नीना म्हणाल्या, ‘माझे पती दिल्लीत राहतात, आणि मी मुंबईत राहते, आमच्याबरोबर नेहमीच असेच राहिले आहे. म्हणून आम्ही प्रथमच इतक्या दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये एकत्र आलो आहोत. पहिल्यांदाच त्यांनी मला ओळखले, आणि मी त्यांना.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नेहा कक्करने साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस; सोशल मीडियावर शेअर केले गोड फोटो

-अगं बाबोव! आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गाण्यात उर्वशीने घातला होता ‘इतक्या’ कोटींचा ड्रेस; किंमत वाचून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-चक्रीवादळामुळे अभिनेत्री दीपिका सिंगच्या घरापुढे पडले झाड, मग काय अभिनेत्रीने झाडासमोरच लावले जोरदार ठुमके; एकदा पाहाच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा