Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड ‘वडिलांचे कर्म लपवण्यासाठी आईने आत्महत्या केली’, नीना गुप्ता यांचा आत्मचरित्रातून धक्कादायक खुलासा

‘वडिलांचे कर्म लपवण्यासाठी आईने आत्महत्या केली’, नीना गुप्ता यांचा आत्मचरित्रातून धक्कादायक खुलासा

अभिनेत्री नीना गुप्ता काही काळापासून त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या आत्मचरित्राबद्दल चर्चेत आहे. नीना गुप्ता यांनी त्यांच्या ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात स्वतःबद्दल अशा गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या यापूर्वी कोणालाही माहित नव्हत्या. यामध्ये त्यांनी त्यांचे कुटुंब, नातेसंबंध, अफेअर, त्यांच्या मुलीचे लग्न आणि अभिनय कारकीर्द याबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या घरातील समस्यांविषयीही चर्चा केली आहे.

नीना यांच्या कुटुंबाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांना २ कुटुंबे आहेत. या दोन कुटुंबांमध्ये ते राहत होते. त्यांनी सांगितले की, त्यांचे वडील त्यांच्या इतर कुटुंबासोबत रात्र घालवायचे. ते त्यांच्या सुट्ट्या दोन कुटुंबांमध्ये वाटूनही घेत असे. नीना म्हणाल्या की, त्यांची आई याबद्दल खूप दु: खी होती आणि ती हे कधीच कोणासमोर बोलू शकत नव्हती.

नीना म्हणाल्या की, “माझ्या वडिलांनी माझ्या आईसोबत जे केले ते लपवण्यासाठी तिने स्वतःचा जीव घेतला. माझे वडील, आई, भाऊ आणि वहिनी या जगात नसताना मी हे पुस्तक लिहिले आहे, असे मला वाटते. माझे आईवडील किंवा भाऊ हयात असते, तर माझी आई हे पुस्तक लिहू शकली असती असे मला वाटत नाही. कदाचित म्हणूनच मी हे लिहिले आहे.”

नीना गुप्ता यांनी या वर्षाच्या सुरुवातीला ‘सच कहूं तो’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध केले. त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे की, अमलन कुसुम घोष यांच्यासोबत त्यांचे पहिले लग्न एका वर्षापेक्षा कमी कसे टिकले. त्या पुढे म्हणाल्या की, “अमलानला आशा होती की, मी काम करणार नाही आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करेन. परंतु मी स्वतःला ‘नियमित गृहिणी’ बनताना पाहिले नाही.” त्यांच्या एका मुलाखतीत नीना गुप्ता म्हणाल्या की, त्यांनी आजूबाजूला कोणतेही आनंदी वैवाहिक जीवन पाहिले नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी लग्नाची व्याख्या करणे कठीण आहे. मी पाहिलेले सर्व विवाह तडजोडीने भरलेले होते, असे त्या म्हणाल्या.

‘बधाई हो’ २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाद्वारे मोठा कमबॅक करणाऱ्या नीना गुप्ता, त्यानंतर ‘पंगा’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’’, ‘संदीप और पिंकी फरार’, ‘सरदार का ग्रॅंडसन’, ‘डायल १००’ आणि सुपरहिट चित्रपटात दिसल्या. शिवाय त्यांनी ‘पंचायत’ सारख्या वेब सीरिजमध्येही काम केले आहे. नीना आता त्यांच्या आगामी ‘गुडबाय’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे ज्यात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा