Thursday, October 16, 2025
Home मराठी …आणि आईला वाटलं मी हे जग सोडून गेले! खुद्द मसाबा गुप्ताने केला तिच्या अयुष्याविषयी ‘हा’ खुलासा

…आणि आईला वाटलं मी हे जग सोडून गेले! खुद्द मसाबा गुप्ताने केला तिच्या अयुष्याविषयी ‘हा’ खुलासा

मंडळी एरवी आपण जास्तीत जास्त उशिरा किती वाजता उठता? १०, ११ किंवा फार फार तर १२ वाजता समजुया. पण म्हणून आपल्याला आपल्या घरच्यांनी मृत समजलं आहे का? उलट घरातले रागात असले तर इतके बोल लावतात की आपण बोल ऐकण्यापेक्षा आपण एकदाचे अंथरुणातून उठतो. पण आपल्याला ठाऊक आहे का की एका सेलिब्रिटी मुलीसोबत याच्या पेक्षा भयंकर प्रकार घडला आहे. कोण आहे ही सेलिब्रिटी किड चला तर पाहुयात.

फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट टाकली आणि लिहिलं की ख्रिसमसच्या सकाळी तिची आई नीना गुप्ता यांना वाटलं की मसाबाचा मृत्यू झाला आहे. आणि हे त्यांना वाटलं कारण मसाबा त्यादिवशी उशिरा पर्यंत झोपली होती म्हणून! मसाबाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्टोरीमध्ये लिहिलं होतं की,”नीना गुप्ता यांच्या तर्फे आपल्याला शुभ प्रभात! ज्यांनी मला सांगितलं की त्या मला पाहायला येत होत्या कारण की सकाळी ९.३० वाजता उठल्यामुळे (जे यापूर्वी कधीच झालं नव्हतं) त्यांना वाटलं की माझा मृत्यू झाला आहे. ही काय ख्रिसमस आहे?”

आता या परिस्थितीला आपण काय नाव द्याल? यात चूक कोणाची नीना गुप्ता यांची की मसाबाची? ते काहीही असो पण हे वाचून आपल्याला हसू मात्र खूप येत असेल. मसाबा आणि तिची आई नीना गुप्ता या दोघीही मुंबईतील मुक्तेश्वर हिल्स येथे राहतात.

ऐंशीच्या दशकातील महान कॅरेबियन क्रिकेटर सर व्हीव्हीयन रिचर्ड्स हे भारतात क्रिकेटच्या दौऱ्यांसाठी यायचे. त्यावेळी त्यांची भेट अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याशी झाली. दोघेही रिलेशनशिपमध्ये आले. दोघांमध्येही तेव्हा शारीरिक संबंध तयार झाले होते. या संबंधातून त्यावेळी नीना या गरोदर राहिल्या होत्या. यानंतर १९८९ मध्ये नीना यांनी मसाबा गुप्ता हिला जन्म दिला. दोघांनीही एकमेकांसोबत लग्न केलं नाही. परंतु नीना यांनी एकटीने मसाबाचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला.

माध्यमांशी बोलताना नीना सांगतात की, “मला जर आयुष्यात एखादी चूक सुधारण्याची संधी मिळाली असती तर मी विनालग्नाची आई झाले नसते. प्रत्येक मुलाला दोन्ही पालकांची गरज असते. मी मसाबाच्याप्रति प्रामाणिक होते आमच्या नात्यावर कसलाच फरक पडला नाही. परंतु मला ठाऊक आहे की मसाबाने बाहेरील जगाच्या नजरेला सफर केलं आहे.”

मसाबा ही कुमारी मातेची लेक असल्याने तिला लहानपणी लोक चिडवत असत. तिला त्यावेळी त्या शब्दांचा अर्थ देखील कळत नसे ती घरी जाऊन नीना यांना त्या शब्दांचा अर्थ विचारत असे. नीना देखील तिला अर्थ सांगत परंतु अशा विशेष टोमण्यांसाठी, अभद्र शब्दांसाठी तयार राहायला सांगत. जसजशी मसाबा मोठी होत गेली तिने तिचं मन घट्ट करून घेतलं होतं. या सगळ्या परिस्थितीत नीना यांनी मसाबाला कधीच तिच्या वडिलांपासून म्हणजेच विव्ह रिचर्ड्स यांच्यापासून कायमचं तोडलं नाही. लहानपणी अधून मधून त्या तिला विव्ह रिचर्ड्स यांच्याकडे घेऊन जात असत. विव्ह रिचर्ड्स देखील स्वतः तिला भेटायला येत असत.

मसाबा ही फॅशन सुप्रसिद्ध डिझायनर असून तिने २०१५ मध्ये चित्रपट निर्माता मधु मंटेना याच्याशी विवाह केला होता. परंतु दोघेही २०१९ मध्ये मतभेदांमुळे वेगळे झाले. आणि त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. आज मसाबा ही तिची आई नीना गुप्ता यांच्या सोबत राहते.

हे देखील वाचा