Wednesday, July 3, 2024

नीना गुप्तांची विमानतळावरील कर्मचाऱ्यांवर आगपाखड; व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या, ‘मला ओरडायचे…’

बॉलिवूड दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या अभिनयासोबत त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे देखील चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या फॅशन सेन्समुळे त्या त्यांच्या चाहत्यांना प्रभावित करत असतात. तसेच सामान्य माणसाच्या आयुष्यातील अनेक समस्या देखील त्या सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नीना विमानतळावरील स्टाफवर भडकलेल्या दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये नीना गुप्ता सांगत आहेत की, कशाप्रकारे एकमेकांसोबत ताळमेळ नसल्याने त्यांना विमानतळावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी कॅप्शन दिले आहे की, “आज मला विमानतळावर खूप वाईट अनुभव आला. जर तुमच्याकडे ऑनलाईन बोर्डिंग पास असेल, तरी देखील हार्ड कॉपी तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. माझ्याजवळ हार्ड कॉपी नव्हती. मी लाईनमध्ये उभी होते.” (Neena Gupta very angry on airport stafs share video on Instagram)

त्यांनी पुढे लिहिले की, “त्यांनी मला विचारले की, तुमचा बोर्डिंग पास कुठे आहे, यावर मी म्हणाले की, अरे मी आणला नाही, विसरून गेले. मी परत बोर्डिंग पास घ्यायला गेले, तेव्हा त्यांनी सांगितले की, तुमच्या मोबाईलमध्ये जो पास आहे तो चालेल. मग मी परत आले आणि लाईनमध्ये उभी राहिले. परंतु त्यांनी परत माझ्याकडे हार्ड कॉपी मागितली. यावर मला खूप राग आला, पण मला तेव्हा ओरडायचे नव्हते. मग मी त्यांना म्हणाले की, तुम्हाला तुमच्या गोष्टी माहीत असायला पाहिजे.”

नीना गुप्ता यांच्या या पोस्टवर अनेक चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत, तर काही अभिनेत्रींनी यावर सहमती दर्शवली आहे. काहीजण म्हणत आहेत की, त्यांना अशाप्रकारे व्हिडिओ बनवायला नव्हता पाहिजे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\

-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

-आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद

हे देखील वाचा