Wednesday, July 3, 2024

‘तपासणी करताना डॉक्टरांनी अचानक…’, लहानपणी अनेकदा डॉक्टरांनी आणि टेलरने केले होते नीना यांचे शोषण

आपण नेहमी किंबहुना दररोज स्त्रियांबद्दल होणाऱ्या दुष्कृत्यांबद्दल ऐकतो, वाचतो, पाहतो. आपल्याला नेहमी असे वाटते की, अभिनेत्री नेहमी त्यांच्या सुरक्षा रक्षकांसोबत फिरतात त्यामुळे त्यांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत नसेल. मात्र असे नाहीये या घटनांना अभिनेत्री देखील अपवाद नसतात. अनेक अभिनेत्री त्यांच्या जीवनातील अशी काळी सत्ये समाजासमोर मोठ्या हिंमतीने मांडतात. बॉलिवूडमधील दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीना गुप्ता त्यांच्या चित्रपटांसाठी आणि सध्या त्यांचे आत्मचरित्र असणाऱ्या ‘सच कहू तो’मुळे खूपच चर्चेत आहे. या पुस्तकातून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक लहान मोठ्या घटनांबद्दल खुलासे केले आहेत.

याच पुस्तकातून त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या एक वाईट घटनेला देखील लोकांसमोर आणले आहे. लहान असताना नीना या शोषणाला बळी पडल्या होत्या. एक नाही तर दोन वेगवेगळ्या लोकांनी त्यांचे शोषण केले होते. त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, एकदा त्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडे त्यांच्या भावासोबत डोळे तपासण्यासाठी गेल्या होत्या. भावाला बाहेरच थांबण्यासाठी सांगण्यात आले. त्या एकट्या केबिनमध्ये गेल्या. तिथे गेल्यावर त्या डॉक्टरांनी त्यांचे डोळे तपासण्यास सुरुवात केली आणि अचानक त्याने त्यांना इतर ठिकाणी स्पर्श करण्यास सुरुवात केली. ज्याचा त्यांच्या डोळ्यांशी कोणताच संबंध नव्हता. तेव्हा त्या खूप घाबरल्या. त्यांना त्यांचा स्वत:चा तिरस्कार वाटू लागला. घरी गेल्यावर त्या एका कोपऱ्यात बसून खूप रडल्या. त्यांची त्यांच्या आईला सांगण्याची देखील हिंमत झाली नाही. कारण त्यांना वाटत होते की, त्यांचीच चूक आहे असे सर्व बोलतील. किंवा त्यांनीच काही केले असेल. असे आई म्हणेल. त्या डॉक्टरांनी त्यांच्यासोबत असे अनेकदा केले होते.

याशिवाय त्यांना असाच एक अनुभव एका टेलरचा देखील आला होता. त्या टेलरकडे कपडे शिवण्यासाठी गेल्या. टेलर माप घेत असतानाच इतरत्र देखील हात लावत होता. त्यांना खूपच विचित्र वाटत होते. मात्र त्या टेलरकडे जाण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कारण त्यांनी जर आईला दुसरीकडे जाण्याबद्दल सांगितले तर आई विचारेल का नाही जायचे या टेलरकडे? या प्रश्नाचे उत्तर नीना यांच्याजवळ नव्हते.

त्या १६ वर्षाच्या असताना त्यांच्या मित्राच्या भावाने त्यांना लग्नासाठी प्रपोज केले होते. मुख्य गोष्ट म्हणजे तेव्हा त्या मुलाचे नुकतेच लग्न झाले होते. त्यावेळी नीना यांनी सजदारी दाखवत प्रकरण उत्तम पद्धतीने हाताळले आणि त्याला नकार दिला. नीना यांनी या पुस्तकात पुढे लिहिले आहे की, अशा घटना अनेक मुलींसोबत होतात. पण त्या मुली घरी सांगत नाही. कारण जेवढे थोडेफार स्वातंत्र्य त्यांना मिळते ते देखील मिळणार नाही आणि त्यांनाच दोष दिला जाईल. ही भीती सतावत असते.

आजकालच्या मुलांना कमी वयातच चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श सांगितला जातो. यामुळे टीनएजमध्ये आल्यानंतर त्यांना हे दोन्ही स्पर्श स्पष्ट समजतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १५’ सापडला वादाच्या विळख्यात, सेट डिझाईनरवर लावले जातायेत चोरीचे आरोप

-‘अशक्य सुंदर’, अमृता खानविलकरचा फोटो पाहून चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-‘कुछ कुछ होता है अभ्या…’, म्हणत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाने मजेशीर फोटो केले शेअर

हे देखील वाचा