बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता यांनी इंडस्ट्रीमधील अनेक गाजाणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड क्षेत्रामध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नुकतंच त्यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने तिचा बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रा याच्यासोबत विवाह बंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाला नीनजींचा एक्स बॉयफ्रेंड वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स याने देखील हजेरी लावली होती. त्या नेहमी विवियनबद्दल बोलत असतात त्याशिवाय त्यांच्या एका पुस्तकामध्ये मसाबाच्या जन्मावेळीच्या प्रसंगाचा उल्लेखही केला होता.
नीना गुप्ता (Neaena Gupta) अभिनयासोबतच आपल्या परखड वक्तव्यांसाठी देखिल ओळखल्या जातात. त्यांना बॉलिवूडमध्ये बेधडक अभिनेत्री म्हणूनही ओळखलं जातं. नुकतंच त्याच्या मुलीचं लग्न झालं आहे. ‘सच कहू तो असं’ त्यांच्या नाव असून आत्मचरित्राच्या पुस्तकामध्ये त्यांनी एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. ‘नीनाजींच्या एका मित्राने गे व्यक्तीशी लग्न कर असा सल्ला दिला होता. सामाजिक दबाव टाळण्यासाठी त्या व्यक्तीला लग्न करायचे आहे. मात्र ती व्यक्ती त्यांचा आणि त्यांच्या मुलीचा स्वीकार करण्यास तयार नव्हती.’
नीना गुप्ता याचं 1980 साली विवियन रिचर्ड्स (Viv Richards) सोबत रिलेशनशिपमध्ये आल्या असनू त्यच्याकडून त्यांना एक मुलगी देखिल आहे. मात्र, विवियन याने नीनाजींशी विवाह केला नाही आणि 1989 साली नीनाजींनी मसाबाला जन्म दिला. त्या नेहमी विवियनच्या संपर्कात असायच्या मात्र, त्याचं लग्न झालं आल्याने त्याने नीनजींसाठी त्याच्या बायकोला सोडण्यास नकार दिला. यानंतर नीनाजींनी एकटीने मसाबाला लहानाचं मोठं केलं आणि 2008 साली त्यांनी विवेक मेहरा (Vivek Mehra) यांच्याशी लग्न केलं.
View this post on Instagram
नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून अभिनेत्री देखिल आहे. तिने नुकतंच अभिनेताल सत्यदीप मिश्रासोबत लग्न गाठ बंधाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या लग्नाला जगजाहिर केलं.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लोकांना शाहरुखचा…’, पठाण वादावर शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
सुकेशला करायचे होते चाहत खन्नाशी लग्न?, पाहा कसे आणि कुठे केले अभिनेत्रीला प्रपोज