Saturday, June 29, 2024

आनंद द्विगुणीत! गायिका नीति मोहनच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; पतीने सोशल मीडियावरून दिली गोड बातमी

आपल्या सुमधुर गाण्यांनी बॉलिवूडसृष्टीला सुपरहिट गाण्यांचा खजिना देणारी गायिका म्हणजे नीति मोहन. नीति मोहनची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. तसेच ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच निती मोहन आणि तिचा पती निहार पांड्या यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी दिली आहे. गुरुवारी (२ जून) गायिका निती मोहन हिने बाळाला जन्म दिला आहे.

अभिनेता निहार पांड्या याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट करून या गोष्टीची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. त्याने इंस्टाग्रामवर त्याच्या आणि नीतिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये निहार नीतिच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा नीति गरोदर होती. हा फोटो शेअर करून त्याने माहिती दिली आहे की, त्याला आणि नीति मोहनला मुलगा आहे झाला आहे. तसेच बाळाची आणि आईची तब्बेत ठीक असल्याची देखील माहिती दिली आहे. या माहितीनंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या चिमुकल्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

यासोबतच नीति मोहनची बहीण शक्ती मोहन हिने देखील सोशल मीडियावर ती मावशी झाल्याची बातमी दिली आहे. तिने नीति आणि निहार यांचा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “मुलगा झाला आहे.” तसेच तिची दुसरी बहिणी मुक्ती मोहन हिने देखील सोशल मीडियावर ही गोड बातमी दिली आहे.

नीति मोहन आणि निहार पांड्या यांनी फेब्रुवारी महिन्यात त्याच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी ते दोघेही आई- बाबा होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. त्यांनी त्याचे फोटो शेअर करून लिहिले होते की, “1+1=3 मॉम टू बी अँड डॅड टू बी. आमच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी ही गोड बातमी देण्या व्यतिरिक्त काय आनंद असू शकतो. हॅपी अनिवर्सरी माय लव्ह.”

नीति मोहनने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. यात ‘इश्क वाला लव्ह’, ‘मनवा लागे’, ‘गलत बात है’, ‘वफा ने बेवफाई’, ‘बॅड बॉय’, ‘फर्स्ट क्लास’ यांसारख्या अनेक गाण्यांचा समावेश होतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा