Saturday, July 6, 2024

8 वर्षांची असल्यापासून करतेय अभिनय, आता आहे ‘या’ मोठ्या अभिनेत्रीची सासू

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केले. बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या मनात त्यांनी घर केले आहे. आजही त्यांचे नाव मोठ्या  सुपरस्टार्सच्या यादीत त्यांचे नाव घेतले जाते. आज आपण अशाच एका सुपरस्टारचा बालपणाविषयी जाणून घेणार आहोत.

वयाच्या 8 व्या वर्षापासून इंडस्ट्रीत काम करणाऱ्या या बालकलाकाराला पाहून तुमचाही गोंधळ होईल पण ही सेलिब्रिटी कोण आहे? आजही तिचे नाव बॉलीवूडच्या आकर्षक अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. वयाच्या 64 व्या वर्षीही तिचे सौंदर्य आणि तिचा अभिनय कायम आहे. तर ही अभिनेत्री कोण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहूया.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ultra Bollywood (@ultrabollywood)

1968 मधील दो कलियां, ‘बच्चे मन के सच्चे’ किंवा सिनेमातील प्रसिद्ध गाणे तुम्हांला आठवत असेलच.  या गाण्यात पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि दोन वेण्या घातलेली ही छोटी मुलगी कोण आहे हे तुम्हाला सांगता येयील का? या दिग्गज अभिनेत्री नीतू कपूर आहे. वयाच्या 8 व्या वर्षी त्यांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

नीतू सिंगचा यांचा जन्म 8 जुलै 1958 रोजी दिल्लीत झाला. त्यांनी बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांनी 1973 मध्ये आलेल्या ‘रिक्षावाला’ चित्रपटातून पदार्पण केले. एकामागून एक अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांनी 1983 मध्ये अगदी लहान वयातच फिल्मी दुनियेपासून त्या दूर गेल्या. कारण 1980 मध्ये त्यांनी अभिनेता ऋषी कपूर यांच्यासोबत लग्न केले, त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ कुटुंबासोबतच घालवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी खेल-खेल में, कभी कभी, धरमवीर, दीवार, दो दूनी चार, जब तक है जान आणि बेशरम इत्यादी अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. एवढेच नाही तर त्यांनी पती ऋषी कपूर यांच्यासोबत एकूण 12 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

26 वर्षांनंतर नीतू कपूर पुन्हा एकदा 2009 मध्ये मोठ्या पडद्यावर दिसल्या आणि ‘लव्ह आज कल’मध्ये छोटी भूमिका केली. यानंतर पती ऋषी कपूर यांच्या निधनानंतरही त्या मोठ्या पडद्यावर सक्रिय राहिल्या आणि नुकतीच ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात त्या दिसल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

नीतू कपूर ह्या त्यांची मुले रिद्धिमा आणि रणबीर कपूर यांच्यावर खूप प्रेम करतात. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या दोन मुलांची खूप काळजी घेतली आणि अनेकदा त्यांच्यासोबत वेळ घालवताना दिसल्या. नीतू कपूर आजी झाली आहे, पण आजही त्यांच्या सौंदर्याला तोड नाही. (neetu kapoor debut in Bollywood as a child artist age of 8 year old)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दाक्षिणात्य सुंदरी झाल्या भोजपुरी चित्रपटांच्या ‘क्वीन’, आता आहेत तरी कुठे?
‘माझ्या पतीने 15 कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली…,’ महिलेचा खळबळजनक दावा

हे देखील वाचा