बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर यांनी अनेक चित्रपटात काम करून नाव कमावले आहे. ऋषी कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांना अनेक प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. नीतू कपूर आणि दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांना दोन मुलं आहेत. ते म्हणजे रणबीर कपूर आणि रिद्धीमा कपूर. नीतू कपूर यांनी सांगितले आहे की, का त्यांना रणबीर कपूरसोबत नाही राहायचे.
एका मुलाखतीत दरम्यान नीतू कपूर यांनी सांगितले होते की, “मला असे वाटते की, माझ्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात बिझी व्हावे. कोरोना महामारीमध्ये रिद्धीमा माझ्यासोबत होती. त्यामुळे मला खूप काळजी वाटत होती कारण तिला परत जाता येत नव्हते.”
नीतू कपूरने पुढे सांगितले की, “मला खूप अस्वस्थ राहण्याची सवय लागली आहे. मी तिला नेहमी सांगत होते की, रिद्धीमा तू परत जा. भारत एकटाच आहे. मी खरंतर तिला स्वतः पासून लांब ढकलत होते. कारण मला माझी प्रायव्हसी खूप आवडते आणि मला अशाच पद्धतीने जगायला देखील आवडते. मला अजूनही आठवण आहे जेव्हा रिद्धीमा शिक्षणासाठी लंडनला गेली होती, तेव्हा मी खूप रडत होते.”
नीतू यांनी पुढे सांगितले की, “जर रिद्धीमाला कोणी भेटायला जरी गेले किंवा बाय करायला जरी गेले तरी मला खूप रडू येत होते. पण त्यांनतर काही वर्षांनी जेव्हा रणबीर बाहेर गेला, तेव्हा मात्र मला अजिबात रडायला आले नाही. तेव्हा रणबीर मला म्हणाला होता की, आई तू माझ्यावर अजिबात प्रेम करत नाही. पण तेव्हा विषय प्रेमाचा नव्हता तर तोपर्यंत मला तसे जगायची सवय झाली होती.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मुलगा ऋतिक रोशनप्रमाणेच राकेश रोशनही आहेत बेस्ट डान्सर? सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
-‘सीटी मार’ गाण्यावर थिरकली ‘बजरंगी भाईजान’ फेम मुन्नी, चाहत्यांनी दर्शवली पसंती; पाहा व्हिडिओ