Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड व्हिडिओ: ‘शोमॅन’ राज कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सून नीतू कपूर यांनी व्हिडिओ केला शेअर

व्हिडिओ: ‘शोमॅन’ राज कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सून नीतू कपूर यांनी व्हिडिओ केला शेअर

हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शोमॅन’ म्हणजेच राज कपूर यांची बुधवारी (२ जून) पुण्यतिथी होती. त्यांनी २ जून, १८८८ रोजी राज कपूर यांनी या जगाचा निरोप घेतला आणि एका मोठ्या युगाचा अंत झाला. राज कपूर यांनी बॉलिवूडला अनेक अविस्मरणीय आणि दर्जेदार कलाकृती दिल्या. अभिनयासोबतच उत्कृष्ट दिग्दर्शन आणि चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. राज कपूर यांच्या नावाशिवाय हिंदी सिनेमांचा इतिहास निव्वळ अशक्य. राज कपूर यांच्या निधनानंतर इतक्या वर्षानी देखील त्यांची कमी भरून निघाली नाहीये.

त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कपूर घराण्याची आणि राज कपूर यांची सून असलेल्या नीतू कपूर यांनी राज कपूर यांचा एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये राज कपूर हे त्यांच्या यशाबद्दल आणि आयुष्याच्या अनुभवाबद्दल बोलताना दिसत आहे.

ते या व्हिडिओमध्ये बोलतात की, “जाने कहाँ गए वो दिन…मी जे होऊ इच्छित होतो, अजूनपर्यंत तिथे पोहोचू शकलो नाहीये. मला असे वाटते की, जेव्हा मी माझी स्वतःची भूमिका निभावत असेल, तेव्हा देवाने मला त्याच्याकडे नको बोलवायला. वेळ नेहमीच आपल्याला त्याची किंमत आणि इतर अनेक गोष्टी शिकवत असते. त्या ईश्वराने आपल्याला जे काही दिले आहे, त्यासाठी आपण नेहमीच त्याला धन्यवाद म्हटले पाहिजे.”

राज कपूर पुढे म्हणतात, “वेळ खूपच थोडा आहे. सतत चालत राहणे म्हणजेच आयुष्य आहे. हे जग म्हणजे ‘हाउस ऑफ हार्ट ब्रेक’ आहे. जर तुम्ही यशस्वी असाल, तर तुमच्या आजूबाजूला असणारे लोकंच तुम्हाला कमीपणा दाखवतील तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करत चालत राहून येणाऱ्या अडचणींना धीराने सामोरे गेले पाहिजे. यामुळेच तुम्ही यशाची चव चाखू शकता.”

नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमधून राज कापूर यांचे बोलणे ऐकून त्यांच्या जीवनात त्यांनी घेतलेला अनुभव आणि समस्यांवर केलेली मात यांमुळेच त्यांना यश मिळाल्याचे समजते. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स आणि लाईक्स केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा