Saturday, August 9, 2025
Home बॉलीवूड बाप रे! लग्नाच्या दोन दिवसातच आलियाला सहन करावा लागतोय सासुरवास, सासूने ठेवली ‘ही’ अट

बाप रे! लग्नाच्या दोन दिवसातच आलियाला सहन करावा लागतोय सासुरवास, सासूने ठेवली ‘ही’ अट

महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट आता नीतू कपूरची सून झाली आहे. १४ एप्रिल रोजी, आलिया आणि रणबीर कपूर यांनी कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत एकमेकांचा हात धरला आणि ७ जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले. रणबीर आलियाच्या लग्नाने त्याचे चाहते खूश आहेत, तर नीतू कपूरच्याही आनंदाला पारावार उरलेला नाही. लग्न झाल्यावर नीतूने आलियासमोर एक मागणी ठेवली आहे. आलियाने आता घर सांभाळावे, अशी नीतू कपूरची मागणी आहे.

सध्या नीतू कपूर डान्सिंग रिअॅलिटी शो ‘डान्स दीवाने ज्युनियर’मध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. अलीकडेच शोमध्ये तिने रणबीर आणि आलियाच्या लग्नाबद्दल सांगितले आणि आता आलियाने घरावर राज्य करावे अशी तिची इच्छा आहे. सुनेचे कौतुक करताना नीतू कपूरने आलिया भट्टला बेस्ट म्हटले.

रणबीर आणि आलियाचे कुटुंब त्यांच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो सतत शेअर करत असतात. दरम्यान, नीतू कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये दोघांचे कुटुंब अतिशय शाही अंदाजात दिसत आहे. या फोटोसोबत रणबीर-आलिया, नीतू कपूर, सोनी राजदान, महेश भट्ट, रिद्धिमा कपूर आणि तिचा पती भरत साहनी दिसत आहेत. फोटो शेअर करताना नीतूने ‘माय फॅमिली’ कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

नीतूने तिच्या इंस्टाग्रामवर रणबीरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मुलाच्या खांद्यावर हात ठेवून रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. मुलाच्या लग्नाचा आनंद नीतूच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. फोटो शेअर करताना नीतू कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे समर्पित आहे कपूर साहब, तुमची इच्छा पूर्ण झाली.” अशाप्रकारे कपूर कुटुंबातील सगळे जण आता त्यांच्या लग्नातील फोटो शेअर करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा