Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड ‘जीवन पूर्वीसारखे होणे शक्य नाही’, म्हणत ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर झाल्या भावुक

‘जीवन पूर्वीसारखे होणे शक्य नाही’, म्हणत ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर झाल्या भावुक

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी ‘बॉबी’ या चित्रपटापासूनच प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते. पूर्ण जग त्यांच्यासाठी वेडे होते. प्रत्येकजण त्यांची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करत असायचा. ऋषी कपूर यांनी हिंदी सिनेमांना असंख्य सुपरहिट चित्रपट दिले. त्यांनी अचानक या जगाला निरोपा दिल्यानंतर, संपूर्ण बॉलिवूडला आश्चर्याचा धक्काच बसला. शुक्रवारी (३० एप्रिल) त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनीही सोशल मीडियावर एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

ऋषी कपूर यांचा एक जुना फोटो शेअर करत, नीतू कपूर यांनी लिहिले की, “मागचे वर्ष संपूर्ण जगासाठी खूप वाईट होते, पण आमच्यासाठी त्यापेक्षाही अधिक वाईट होते. कारण आम्ही त्यांना गमावले. या वर्षभरात एकही असा दिवस आला नसेल, जेव्हा आम्ही त्यांच्याबद्दल बोललो नाहीत किंवा त्यांना आठवले नाही. परंतु आम्ही वर्षभर ओठांवर स्मित ठेवून, त्यांची आठवण काढली. कारण ते नेहमी आमच्या हृदयात राहतात. यासोबतच आम्ही हे मान्य केले आहे की, त्यांच्याशिवाय आमचे जीवन पूर्वीसारखे होणे शक्य नाही, परंतु आयुष्य पुढे जातच राहील.”

पुण्यतिथीनिमित्त ऋषी कपूर यांची लाडकी मुलगी रिद्धिमा, हिनेही त्यांची आठवण काढली. तिने स्वतःचा बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटो शेअर करत रिद्धिमाने लिहिले की, “माझी इच्छा आहे की तुम्ही मला पुन्हा एकदा मुश्क म्हणावे आणि जोपर्यंत आपण पुन्हा भेटणार नाहीत, तोपर्यंत आम्ही नेहमीच तुमच्याबद्दल विचार करत राहू.”

https://www.instagram.com/p/CORlV1tM3wy/?utm_source=ig_web_copy_link

सन २०२० मध्ये, कर्करोगाशी झुंज देत असताना, अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाला निरोप दिला होता. २०१८ सालीच त्यांना कर्करोग असल्याची बातमी समोर आली होती. अमेरिकेत वर्षभर उपचार घेतल्यानंतर, ते भारतात परतले होते. मात्र ३० एप्रिल, २०२० रोजी, ऋषी कपूर हे जग सोडून गेले. त्यांच्या शेवटच्या काळात, पत्नी नीतू कपूर त्यांच्यासोबत होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-धरम पाजी अन् ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांची नाही झाली मागील एक वर्षांपासून भेट, काय आहे कारण?

-कोरोनाच्या समोर सोनू सूदही झाला असहाय्य! ट्वीट करत म्हणाला, ‘दिल्लीमध्ये देव शोधणे सोपे, पण…’

-अवघ्या देशाला नजरेने वेड लावणारी प्रिया प्रकाश वाॅरियर, आता नव्या लूकनेही पाडतेय सर्वांना भुरळ! पाहा खास फोटो

-‘मी शांत बसणार नाही…’, आमिर खानसोबत काम केलेल्या अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, भाजपवर मोठा आरोप

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा