Friday, July 5, 2024

व्हिडिओ: अक्षरा अन् मिलिंदच्या नवीन कनेक्शनमुळे नेहा का पडली चिंतेत?

‘बिग बॉस ओटीटी’ हा शो जितका मजेशीर आहे, तितकाच वादग्रस्त देखील आहे. दररोज या घरामध्ये कुणाची ना कुणाची भांडणे होत असतात. यामध्ये सहभाग घेतलेले स्पर्धक जास्तीत जास्त दिवस बिग बॉसच्या घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करतात. यादरम्यान त्यांना काही टास्क दिले जातात. हे टास्क पूर्ण करत असताना अनेक वेळा मोठे वाद निर्माण होतात. या शोचा सूत्रसंचालक करण जोहरबरोबर देखील अनेकदा वाद झाले आहेत. बिग बॉसच्या घरात वादापासून कोणताही स्पर्धक स्वतःला वाचवू शकत नाही. इथे प्रत्येकाची मतं वेगळी असतात आणि त्यामुळे एकमेकांचे विचार न पटल्याने वाद होतात. अशात सध्या अक्षरा सिंग तिच्या भांडणांमुळे चांगलीच चर्चेत आहे.

भोजपुरी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंग बिग बॉसमधील दमदार स्पर्धक म्हणून पुढे येत आहे. जस जशी ती इथे पुढे चालली आहे, तस तसे तिच्या मार्गातील अडथळे वाढत चालले आहेत. नुकतेच अक्षराचे झीशान खानबरोबर भांडण झाले होते. त्यामुळे अनेक वृत्तांमध्ये तिच्याच बातम्यांची चर्चा सुरू होती आणि आता पुन्हा एकदा तिचे नेहा भसीनबरोबर भांडण झाल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

अक्षराने आता मिलिंद गाबाला आपला नवीन पार्टनर बनवला आहे. तसेच तिने या व्हिडिओत म्हटले की, “मी माझे हे हृदय माझा मित्र गाबाला देईन आणि त्याला कधीच ऐकटे सोडणार नाही. मी एक फायटर आहे आणि तो आतापर्यंत जे करू शकला नाही, ते मी त्याला करून दाखवेन.” अक्षराच्या या वक्तव्यामुळे नेहाला थोडी जेलसी होत असल्याचे दिसत आहे. (neha bhasin is looking angry with bhojpuri actress akshara Singh and gaba new connection)

या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये अक्षरा नेहाला म्हणाली की, “मला असं वाटतं तुला काही प्रॉब्लेम आहे. आतापर्यंत मला जेव्हा जेव्हा असे वाटले की मी गाबाबरोबर बोलल्याने तुला प्रॉब्लेम होतोय, तेव्हा तेव्हा मी त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे.” अक्षराने असे बोलल्यावर प्रतिक्रिया देत नेहा म्हणाली, “मला तुझ्याशी काहीही बोलायचे नाही.”

भोजपुरी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अक्षरा बिग बॉसच्या घरातील नेहाचे मन जिंकू शकली नाही. या दोघींमध्ये सध्या सारखीच भांडणे होत आहेत. त्यांच्या वादाचे कारण हे जेलसी आहे. नेहा प्रत्येकवेळी तिच्यावर जळत असल्याने त्यांच्यामध्ये जास्त वाद होत आहेत. अक्षराच्या चित्रपट कारकिर्दीविषयी बोलायचे झाले, तर तिने ‘सत्यमेव जयते’, ‘साथिया’, ‘सरकार राज’, ‘लव मॅरेज’, ‘मा तुझे सलाम’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

हे देखील वाचा