Monday, July 1, 2024

‘आता तरी सुधरा…’, म्हणत कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर संतापली अभिनेत्री

संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट सर्वत्र पसरली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा आता कोटींच्या घरात गेला आहे. याचमुळे अनेक कलाकार देखील त्यांच्या चाहत्यांना काळजी घ्या, असे वारंवार सांगताना दिसत आहे. कोरोना विषाणूदरम्यान हलगर्जीपणा‌ दाखवणाऱ्यांवर अभिनेत्री नेहा धूपिया हिने राग व्यक्त केला आहे. तिने त्यांची चांगलीच काम उघडणी केली आहे.

अभिनेत्री नेहा धूपिया ही नेहमीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असते. अनेक सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर ती तिचे मत व्यक्त करताना दिसत असते. तिने या वेळेस कोरोना विषाणूबाबत हलगर्जीपणा दाखवणाऱ्या दिल्ली विमानतळावरील एका चित्रावर राग व्यक्त केला आहे. तिने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून दिल्ली विमानतळावरील एक फोटो शेअर केला आहे. त्यातून तिने तिचा संताप व्यक्त केला आहे.

नेहाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये खूपच गर्दी दिसत आहे. हा फोटो बघून समजते की, लोकांना कोरोना विषाणूचे काहीच गांभीर्य राहिले नाही. हा फोटो शेअर करत तिने असे ट्वीट केले की, “विमानतळावर काही माणसे‌ लाईन मधून निघून अशी कारण देतात की, आम्हाला उशीर झाला आहे. परंतु आम्ही लाईनमध्ये उभे राहण्यासाठी सकाळी लवकर उठून येतो. तसेच अर्धा मास्क तोंडावर आणि अर्धा खाली असतो आणि यावर अशी सफाई देतात की तो आरामदायी नाहीये. आम्ही मात्र खूप सावधान असल्याप्रमाणे मास्क लावतो.”

नेहाने दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “आता तरी सुधरा, आपल्यासाठी आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांसाठी सुधरा. यासोबतच तिने लिहिले की, कृपया मास्क वापरा, सॅनिटायजर‌ वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. आपल्याला ही गोष्ट अजून किती वेळा सांगावी लागणार आहे. हे सगळं आपल्या भल्यासाठीच चालले आहे.” नेहाचे ट्वीट खूप वेगाने व्हायरल होत आहे आणि तिचे चाहते यावर प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नेटकरी तर नेटकरी, आता बिग बींनीही साधला ‘विरुष्का’वर निशाणा, जोक वाचून चाहत्यांमध्ये हास्याचा कल्लोळ

-लॉकडाऊनमुळे बॉलिवूडवर येऊ शकते मोठे संकट, कामगार संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

-बापरे! ‘हिरो नंबर १’ गोविंदा सापडला मोठ्या अडचणीत, पत्नीने दिली माहिती

हे देखील वाचा