बॉलिवूडमधून अनेक गोड बातम्या येत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आई झाल्याची बातमी समोर आली आहे. नेहाने रविवारी (३ ऑक्टोबर) एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीचा पती अंगद बेदी याने ही बातमी सोशल मीडियावर चाहत्यांशी सोबत शेअर केली आहे. याआधी अंगद आणि नेहाला एक मुलगी आहे.
या वर्षी जुलै महिन्यात नेहा आणि अंगदने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून ते दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत, ही बातमी सर्वांना दिली होती. या फोटोमध्ये नेहा, अंगद आणि त्यांची मुलगी मेहर दिसत होती. (Neha Dhupia and Angad bedi become parents, neha give a birth to baby boy)
आज अंगदने नेहासोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही गोड बातमी दिली आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “सर्व शक्तीमानने आज आम्हाला एका मुलाच्या रुपात आशीर्वाद दिला आहे. नेहा आणि आमचे बाळ दोघेही ठीक आहेत. मेहरने घरातील नवीन सदस्यांचे आगमन करण्यासाठी सगळी तयारी केली आहे. वाहेगुरू आशीर्वाद असू द्या.”
नेहा आणि अंगदने मे २०१८ साली लग्न केले होते आणि त्यांच्यातील खास गोष्ट म्हणजे १८ नोव्हेंबरला त्यांनी त्यांच्या मुलीला जन्म दिला. नेहा लग्नाच्या आधीच प्रेग्नेंट होती. त्यामुळे ती खूपच चर्चेत होती. तिने जेव्हा ती पुन्हा एकदा आई बनण्याची बातमी दिली, तेव्हा तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता.
नेहाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती या आधी ‘देवी’ या शॉर्टफिल्ममध्ये दिसली होती. तसेच ती लवकरच ‘थर्सडे’ आणि ‘सनक’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘सनक’ या चित्रपटात ती विद्युत जामवालसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अंगद बेदीबद्दल बोलायचे झाल्यास, तो ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटात दिसला आहे. या चित्रपटात तो जान्हवी कपूरच्या भावाच्या भूमिकेत होता. या पात्रासाठी अंगदचे खूप कौतुक झाले होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-गर्ल गँगसोबत जंगलात फिरताना, नदीत डुबकी मारताना दिसली जान्हवी कपूर, व्हिडिओ आणि फोटो व्हायरल