प्रसिद्ध शो ‘रोडीज’मध्ये न्यायाधीश असलेली नेहा धुपिया सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मग ते तिचे वक्तव्य असो नाहीतर मग, तिची पोस्ट असो. यामुळे अनेकदा अभिनेत्रीला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. अशातच तिने अलीकडेच तिचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेहा धुपियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये, ती तिच्या लहान मुलाला शर्टच्या खालून दूध पाजताना दिसत आहे. यासोबतच ती कॅप्शनमध्ये फीडिंगच्या स्वातंत्र्याबाबत बोलली आहे. ही पोस्ट पाहून काहीजण तिचं कौतुक करत आहेत, तर काहीजण तिला ट्रोलही करत आहेत.
आधीच एका मुलीचे आई-वडील असलेल्या या दोघांच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वीच चिमुकल्या पाहुण्याने आगमन केलं आहे. मुलगी मेहरनंतर नेहा धुपियाने मुलाला जन्म दिला. नेहा धुपिया गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसी आणि प्रसूतीमुळे चर्चेत आहे. प्रसूती वेदना आणि प्रसूतीदरम्यान नेहाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (neha dhupia breast feeds baby boy promoting freedom to feed this daring photo goes viral over social media)
अंगद बेदीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून, मुलाच्या जन्माची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्याने लिहिलं होतं की, “सर्वशक्तिमानाने आज आम्हाला बाळाचा आशीर्वाद दिला आहे. नेहा आणि मुलगा दोघेही ठीक आहेत. मेहर तिच्या लहान भावाला तिचे ‘बेबी’ हे टायटल देण्यास तयार आहे. बेदी बॉय आला आहे. वाहेगुरु मेहर करे.” यासोबतच अंगदने नेहासोबतचा एक क्यूट फोटोही शेअर केला होता, ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर नेहा अलीकडेच तिच्या आगामी ‘सनक’ चित्रपटासाठी डब करताना दिसली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बेहजाद खंबाटा यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. यासोबतच तेच या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. हा चित्रपट काही अकल्पनीय घटनांवर आधारित असेल. या ऍक्शन थ्रिलर चित्रपटात नेहा धुपियासोबत विद्युत जामवालही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मोनोकनी परिधान करून पूल पार्टीची मजा घेतेय नेहा धुपिया; बेबी बंप केला फ्लॉन्ट
-लग्नाआधीच प्रेग्नेंट झाली होती नेहा धुपिया, तर ताणामुळे खूपच बिघडली होती अभिनेत्रीच्या आईची प्रकृती