अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) या दिवसांत खूप व्यस्त आहे. नुकतेच तिचा ‘ए थर्सडे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी नेहा ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये पोहचली होतो. यावेळी तिने असे काही खुलासे केले आहेत. जे ऐकून चाहते हैराण झाले आहेत. तिने सांगितले की, एका सीनसाठी तिने एका अभिनेत्याला खूप मेहनत करायला लावली होती.
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया, यामी गौतम आणि अतुल कुलकर्णी हे कलाकार ‘ए थर्सडे’ या चित्रपटात आहेत. त्यांचा हा चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाला आहे. सध्या ते त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच कपिल शर्मा शोमधून एक प्रोमो समोर आला आहे. यात कपिल नेहाबाबत सांगत आहे की, “२००८ मध्ये आलेला ‘दसविदानिया’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नेहाने एका अभिनेत्याला ५ वेळा हात धुवायला सांगितले होते. कारण या चित्रपटातील एका सीनमध्ये तिला अभिनेत्याच्या हाताला लीकअप करायचे होते. तेव्हा कपिलने सांगितले की, नेहा हायजिनची खूप काळजी घेते. यावेळी कपिल मस्करीत तिला म्हणाला की, “तू पानीपुरीवाल्याला अंघोळ करून तर नाही ना बोलावत.”
नेहाने २००३ मध्ये ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल केली नाही. परंतु ‘जुली’ या चित्रपटाने खास ओळख निर्माण करून दिली. तिने एका जपानी चित्रपटात देखील काम केले होते. या चित्रपटात तिने बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री मीना यांचे पात्र साकारले होते.
नेहाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, तिने अंगद बेदीसोबत १० मे २०१८ साली लग्न केले. त्यांनी एका गुरूद्वारामध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला त्यांचे काही नातेवाईक आणि मित्र मंडळी उपस्थित होते. त्यांनी लग्नाच्या आधी बरेच दिवस एकमेकांना डेट केले आहे. नेहा आता दोन मुलांची आई आहे. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
हेही वाचा :