Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड ‘ही’ अट ठेवून केले होते रोहन प्रीत सोबत लग्न, अट ऐकून रोहन प्रीतने दिले होते असे उत्तर

‘ही’ अट ठेवून केले होते रोहन प्रीत सोबत लग्न, अट ऐकून रोहन प्रीतने दिले होते असे उत्तर

गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांच्या लग्नाला आता एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. सोशल मीडियावर ते दोघेही अनेकवेळा प्रेम व्यक्त करत असतात अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. दर आठवड्याला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अनेक कलाकार येत असतात. कलाकार त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा करत असतात. अशातच नेहा कक्कर तिच्या लव्ह स्टोरीबाबत एक किस्सा सांगितला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या जोरदार चर्चेत आहे.

नेहा कक्करने रोहनप्रीतसोबतच्या नात्याचा खुलासा करत सांगितले की, कसे त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहचले. ती व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, “रोहूने मला सांगितले होते की, त्याला मी आवडते. परंतु मी त्याला सांगितले की, मला आता सरळ लग्न करायचे आहे. माझे वय आता लग्नाचे आहे त्यामुळे मला डेटिंग करायचे नाही.” यानंतर रोहनप्रीतने सांगितले की, “माझे वय अजून लग्नाचे नाही तर आता कसे लग्न करायचे.” यानंतर बरेच दिवस त्यांचे बोलणे झाले नाही.

नेहाने पुढे सांगितले की, “एक दिवस अचानक रोहनने फोन केला आणि सांगितले की, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकतं, मला देखील लग्न करायचे आहे. रोहनने त्यावेळी ड्रिंक केली होती. त्यामुळे मला वाटले की, सकाळी तो विसरून जाईल. परंतु दुसऱ्या दिवशी त्याने प्रता लग्नाबाबत विचारले तेव्हा मी त्याला मम्मीशी बोलायला सांगितले.”

ते दोघेही ‘नेहू दा ब्याह’ या गाण्याच्या शूटिंग दरम्यान भेटले होते. त्या दोघांनी २४ ऑक्टोबर २०२० साली लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते आता देखील त्यांच्यातील प्रेम सोशल मीडियावर दाखवत असतात. त्यांची जोडी अनेकांना खूप आवडते. रोहनप्रीत नेहापेक्षा लहान आहे तरी देखील त्यांच्यात खूप प्रेम आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा