Wednesday, June 26, 2024

‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’, ‘खड तैनू मैं दस्सा’ गाण्यावरील नेहा कक्करचे एक्सप्रेशन्स पाहून युजरची कमेंट

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका जिने तिच्या आवाजाने सर्वांना अक्षरशः वेड लावले आहे. ती म्हणजे नेहा कक्कर. ती एक गायिकासोबत एक उत्कृष्ट परफॉर्मर देखील आहे. याचा प्रत्यय आपल्याला तिच्या म्युझिक व्हिडिओमधून आला आहे. नेहा कक्करने गायलेली सगळीच गाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तिचे सोशल मीडियावर चांगले फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे तिची गाणी खूप लोकप्रिय होतात. अशातच नेहा कक्कर तिच्या चाहत्यांसाठी ‘खड तैनू मैंं दस्सा’ हे पंजाबी गाणे घेऊन आली आहे. या गाण्यात तिच्यासोबत तिचा पती रोहनप्रीत देखील दिसत आहे. त्यांचे हे गाणे सर्वांना खूपच आवडले आहे. या गाण्याला आतापर्यंत 3.9 मिलियन एवढे व्ह्यूज मिळाले आहेत.

नेहा कक्करने तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्याचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने जांभळ्या रंगाचा क्रॉप टॉप, काळ्या रंगाच्या श्रग तसेच प्रिंटेड स्कर्ट घातली आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये हावभाव करून ती लोकांना तिच्या सोबत डुएट करायला सांगत आहे. नेहाच्या इंस्टाग्राम रीलला 5 लाखांपेक्षाही जास्त वेळा बघितले आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे, तर काहीजण तिला ‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान,’ असे म्हणत आहेत.

‘खड तैंनू मे दस्सा’ हे गाणे नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनी गायले आहे. रजत नागपाल यांनी या गाण्याला संगीत दिले आहे, तर कप्तान यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहेत. अगम अजीम यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. हे गाणे देशी म्युझिक फॅक्टरीवर प्रदर्शित केले आहे. या आधी नेहा आणि रोहनप्रीत हे ‘तू अपना ख्याल रखीया कर’ आणि ‘नेहू दा व्याह’ यामध्ये एकत्र दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तूफानों से’ गाणं म्हणत कैलाश खेर, शिबानी कश्यप अन् सुदेश भोसले यांनी केला कोरोना योद्धांना सलाम

-‘जीना नहीं मुझे हैं मरना’, म्हणत छतावर केला कुणाल खेमूने डान्स, मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ

हे देखील वाचा