Monday, July 1, 2024

अरे बापरे! नेहा कक्कर आणि भाऊ टोनी कक्करमध्ये झाले भांडण; व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

नेहा कक्कर म्हणजे सध्याच्या घडीला संगीत क्षेत्रातील आघाडीचे नाव. नेहाने आजपर्यंत तिच्या आवाजाने प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले, किंबहुना अजूनही करत आहे. तिने गायलेली सर्वच गाणी तुफान लोकप्रिय झाली. आजच्या तरुणांच्या गळ्यातले ताईत असलेली नेहा तिच्या आवाजाने तर प्रेक्षकांचे मनोरंजन करतच असते शिवाय सोशल मीडियावरही ती तिचे विविध मजेशीर व्हिडिओ पोस्ट करूनही ती चाहत्यांचे मनोरंजन करतच असते.

सध्या नेहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नेहा आणि तिचा भाऊ टोनी कक्कर दोघेही दिसत असून टोनी फोनवर बोलत असतो, तेवढ्यात नेहा येते आणि त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते. मात्र, टोनी तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि फोनवर बोलणे सुरू ठेवतो. त्याच्या अशा वागण्यामुळे नेहा चिडते आणि त्याचे कान धरते. यातच दोघांची छोटी आणि क्यूट अशी मारामारी देखील होते.

असा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. नेहाचे चाहते तिच्या या व्हिडिओवर भरभरून कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडत आहेत. नेहा आणि टोनी या व्हिडिओमध्ये नेहाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘खड तैनू मैं दस्सा’ या पंजाबी गाण्यावर रिऍक्शन देताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

नेहा सध्याच्या काळात बॉलिवूडमधील आघाडीची गायिका असून सोशल मीडियावरही ती खूप लोकप्रिय आहे. तिला सोशल मीडियावर ५८ मिलियन फॉलोवर्स असून भारतीय सेलिब्रिटींच्या इंस्टाग्राम फॉलोवर्सच्या यादीत नेहाचा तिसरा क्रमांक लागतो. नेहा अनेकदा तिचे सोलो, कुटुंबासोबतचे, तिच्या नवऱ्यासोबतचे वेगवेगळे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते.

नेहाच्या वर्कफ्रंटबद्दल संगाचे झाले तर सध्या नेहा लोकप्रिय म्युझिक रियालिटी शो इंडियन आयडॉलच्या १२ व्या पर्वत परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. शिवाय तिचे अनेक नवीन अल्बम्स देखील प्रदर्शित झाले असून, त्यांना रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा