Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड नेहा कक्करने केली लग्नानंतरची पहिली होळी साजरी, व्हिडिओ होतोय व्हायरल

नेहा कक्करने केली लग्नानंतरची पहिली होळी साजरी, व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूडमधील आघाडीच्या गायिकांपैकी एक असलेली नेहा कक्करची लग्नानंतरची ही पहिलीच होळी आहे. नेहा तिचे कुटुंबीय आणि पती रोहनप्रीत सिंगसोबत होळीचा सण साजरा करताना दिसली. नेहाने तिच्या चाहत्यांसह होळीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. आता हेच फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये ती तिच्या संपूर्ण कुटुंबासमवेत होळीचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच समोर आलेल्या या व्हिडिओत नेहा कक्कर होळीच्या निमित्ताने चॉकलेट खात आहे. तिच्यासोबत रोहनप्रीत, टोनी कक्कर आणि आई- वडील देखील आहेत.

नेहा कक्करने लग्नानंतरच्या पहिल्या होळीचा हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “आमच्या कुटुंबाच्या वतीने तुम्हाला होळीच्या शुभेच्छा, आनंदी राहा, प्रेम पसरवा #Nehupreet ची पहिली होळी.” अशाप्रकारे नेहा कक्करने तिच्या पहिल्या होळीचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिचे संपूर्ण कुटुंब होळीच्या सणाचा आनंद घेत आहे.

नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली 2014 पासून प्रेमसंबंधात होते. सप्टेंबर 2018 मध्ये, त्यांनी नॅशनल टीव्हीवर त्यांचे नाते अधिकृतपणे घोषित केले आणि ते लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचेही त्यांनी उघड केले. मात्र, तीन महिन्यांनंतर नेहाच्या एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे, त्यांचा ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली. पुढे 24 ऑक्टोबर 2020 रोजी, नेहा कक्करने गायक रोहनप्रीत सिंगशी दिल्लीतील एका गुरुद्वारामध्ये लग्न केले.

नेहा कक्करच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिचे ‘मरजानेया’ गाणे नुकतेच रिलीझ झाले आहे. नेहाने गायलेल्या या गाण्यात रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला दिसले आहेत. गाण्यातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिलजीतने शेअर केला मुलासोबतचा मजेशीर व्हिडिओ, सेलेब्सनी विचारले ‘आई कुठे आहे?’

-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!

-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा

हे देखील वाचा