Monday, July 1, 2024

‘मॉर्डन रांझा’ गाण्यावर नेहा कक्करने लावले ठुमकेे; चाहत्यांसह पती रोहनप्रीत सिंगनेही केले कौतुक!

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर तिच्या पोस्टमुळे सतत चर्चेत असते. आजकाल नेहा ‘इंडियन आयडल 12’ मध्ये जज म्हणून दिसत आहे. अशा परिस्थितीत सिंगिंग रियॅलिटी शोच्या सेटवरून नेहाचा एक इंस्टाग्राम रील व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये नेहा खूपच सुंदर दिसत आहे आणि सिंगस्टाच्या ‘मॉर्डन रांझा’ या नवीन गाण्यावर परफॉर्म करत आहे. नेहा कक्करच्या डान्सचा कोणताही व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल होतो. त्याचप्रमाणे, हा व्हिडिओही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

नेहा कक्करच्या या इंस्टाग्राम रील व्हिडिओला लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळत आहेत. नेहाच्या या व्हिडिओवर तिचा पती रोहनप्रीत सिंग याने देखील कमेंट केली आहे. रोहनप्रीतने पंजाबी भाषेत लिहले, “तू पहले एह दस तू ऐनी सोहणी किवें है??”

त्याचवेळी एका सोशल मीडिया युजरने नेहाच्या इंस्टाग्राम रीलवर “खूप सुंदर दिसत आहेस नेहू,” अशी कमेंट केली आहे. याव्यतिरिक्त दुसर्‍या युजरने लिहिले, “जगातील सर्वात सुंदर मुलगी.” अशा प्रकारे नेहाच्या व्हिडिओवर बऱ्याच चांगल्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

नेहा कक्करबद्दल बोलायचे झाले, तर ती बॉलिवूडची एक नामांकित गायिका आहे. तिने अनेक हिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे. अलीकडेच नेहाचे ‘मरजानिया’ हे गाणे रिलीझ करण्यात आले होते, जे तिच्या चाहत्यांनी खूप पसंत केले. या गाण्यात रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्लाचा रोमान्स पाहायला मिळाला. तसेच, नेहा कक्कर ही बॉलिवूडमधील अशी एकमेव गायिका आहे, जिला सोशल मीडियावर बहुतेक लोक फॉलो करतात.

नेहाच्या हिट गाण्यांच्या यादीमध्ये ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’, ‘दिलबर’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जॉनी लिव्हरच्या मुलीने केला अक्षय कुमारच्या गाण्यावर जोरदार डान्स, व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

-अरुणाचल प्रदेशातील आगीत नुकसान झालेल्या लोकांसाठी धावून आले वरुण- नताशा, केली ‘इतक्या’ लाख रुपयांची मदत

-अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणींना राणीचा ‘गुरुमंत्र’, म्हणाली ‘…तर तुम्ही खुशाल या’

हे देखील वाचा