Saturday, July 6, 2024

बाप रे! आधीच उन्हाळा, त्यात नेहाचा हॉटनेस लूक, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

आपल्या आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका ‘नेहा कक्कर’ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचं वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक, ती अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. नुकताच नेहाचा एक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

या फोटोमध्ये तिने निळया रंगाची साडी घातली आहे आणि त्यावर स्लीव्हलेस वेलवेटचा ब्लाऊज घातला आहे. या फोटोशूटमध्ये नेहा खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे. या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा अक्षरश: वर्षाव होताना दिसत आहे.

या ‌फोटोशूटमध्ये नेहासोबत तिचा पती रोहन प्रीत सिंगदेखील आहे. यामध्ये रोहन खूपच डॅशिंग आणि हँडसम दिसत आहे. यामधे त्याने करड्या रंगाचा कोट, काळ्या रंगाचा शर्ट आणि पँट घातली आहे. या फोटोमध्ये दोघांची केमिस्ट्री बघून कोणीही स्वत: ला हा फोटो लाईक करण्यापासून थांबवू शकणार नाही. नेहाचा हॉटनेस पाहून खुद्द रोहनने या फोटोवर कमेंट केली आहे.

नेहा आणि रोहनची पहिली भेट ‘नेहू दा ब्याह’ या गाण्याच्या सेटवर झाली होती. त्यांच्या पहिल्याच भेटीत रोहनला नेहा खूपच आवडली. त्याचा मनमोकळा आणि निरागस स्वभाव बघून नेहा देखील त्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि याबाबत त्यांच्या कुटुंबियांना कल्पना दिली.

नेहाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती आता इंडियन आयडल 12 या शोची जज आहे. नुकतेेच तिचे ‘और प्यार हो गया’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-केजीएफ स्टार यश प्रेमळ बापाच्या भूमिकेत; बाप- लेकाच्या व्हिडिओला मिळतंय चाहत्यांकडून अफाट प्रेम

-पद्मिनी कोल्हापुरेच्या मुलाच्या लग्नात श्रद्धाचे जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

-‘मी त्याला अनेकदा मरताना पाहिलंय…’, सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावुक, व्हिडिओ केला शेअर

हे देखील वाचा