बॉलिवूडमधील गायिका नेहा कक्कर ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती कधी तिच्या गाण्यांमुळे, तर कधी तिच्या पती सोबतच्या फोटोमुळे ती चर्चेत असते. तिच्या चाहत्यांना तिचा प्रत्येक अंदाज खूप आवडत असतो. तिच्या फोटोवर चाहते कमेंटचा वर्षाव करत असतात. अशामध्येच नेहा कक्करचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये ती तिचे नैसर्गिक सौंदर्य म्हणजेच मेकअप न केलेला चेहरा दाखवत आहे, तर मागे रोहनप्रीत सिंग तिच्यासाठी गाणे गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ संपायच्या आधी ती म्हणते की, “आय लव्ह यू बेबी.” सोबतच हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “तुम्ही जसेही आहात तसे खूप सुंदर आहात. मागे रोहनप्रीत एक गाणे गात आहे. ते भाऊ टोनी कक्करने गायले आहे. कोणताही फिल्टर वापरला नाहीये.”
रोहन प्रीतने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “खूप सुंदर, आय लव्ह यू टू द मून एँड बॅक.” पतीच्या कमेंटने चाहत्यांची मने जिंकली आहेत. चाहत्यांना देखील तिचा हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. या आधी देखील नेहा कक्करने तिचा पती रोहनप्रीत सिंग सोबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ते दोघे भांडताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता.
नेहा तिच्या पतीसोबत इंस्टाग्रामवर नेहमीच रील्स बनवत असते. तिने अशीच एक रील बनवली होती. जीची पहिली झलक पाहून तुम्ही हैराण व्हाल. परंतु नंतर त्यांचा अंदाज प्रेक्षकांना समजला. या दिवसात व्हायरल होणारा व्हिडिओ सर्वांना खूप आवडत आहे. तसेच सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.
तिने रोहनप्रीत सोबत एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती त्याच्यासोबत पाणीपुरी खाताना दिसत होती. त्यांचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. यावर अनेक चाहते कमेंट करत होते. एका चाहत्याने सांगितले होते की, “कोरोना काळात अशी बाहेरची पाणीपुरी खाणे योग्य नाहीये.”
हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले होते की, “जेव्हा आम्ही खड तैनू मैं दस्सा या सेटवर पाणीपुरी खात होतो.” या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ते दोघेही पाणी पुरी खात एन्जॉय करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…