Monday, July 1, 2024

प्रेग्नंसीच्या अफवांवर अखेर नेहा कक्करने सोडले मौन, म्हणाली, ‘माझे बाळ येईल, तेव्हा…’

बॉलिवूडमधील कलाकार असो, गायक असो किंवा डान्सर असो. ते नेहमी लाईमलाईटमध्ये असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललं आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात. त्यांचे लग्न, अफेअर, बाळ, कुटुंब यांबाबत जाणून घेण्यासाठी त्यांना आतुरता असते. अशीच बॉलिवूड गायिका नेहा कक्कर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून ती प्रेग्नेंट आहे,‌ अशा बातम्या येत होत्या. मात्र, त्यावर नेहाने तिची कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता या अफवांवर तिने मौन सोडले आहे.

तिने खुलासा केला आहे की, आता तिचा कुटुंब वाढवण्याचा तिचा कोणताही प्लॅन नाहीये. तिने हे स्पष्ट सांगितले आहे की, तिला आणि रोहनप्रीतला इतक्या लवकर बेबी प्लॅन करायचे नाही. नेहाने हे देखील सांगितले की, ते जेव्हा बेबी प्लॅन करतील, तेव्हा त्यांना कसे बाळ पाहिजे. नेहा नुकतेच तिचा भाऊ टोनी कक्कर आणि रॅपर हनी सिंग यांच्यासोबत ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ मध्ये आली होती.

या शोमध्ये नेहाने तेथील मुलांसोबत खूप मस्ती आणि डान्स केला. यावेळी एका स्पर्धकाने तिला एवढे प्रभावित केले की, तिने हे सांगितले की, तिला असेच बाळ पाहिजे. नेहाला ज्या स्पर्धकाप्रमाणे तिचे बाळ हवे आहे, त्या स्पर्धकांचे नाव गुंजन असे आहे. गुंजनने शोमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे सुप्रसिद्ध गाणे ‘लुंगी डान्स’वर परफॉर्मन्स केला. तिचा डान्स बघितल्यानंतर नेहाने तिचे खूप कौतुक केले. (Neha Kakkar silence on pregnancy rumours tells a contestant want a daughter like you)

गुंजनचा डान्स बघितल्यानंतर नेहाने सांगितले की, “देव तुला खूप आशीर्वाद देवो. मी आणि रोहनने अजून तरी बेबी प्लॅन करण्याबाबत विचार केला नाही. परंतु जेव्हा कधी माझे बाळ येईल, तेव्हा मला असे वाटते की, माझे बाळ गुंजनसारखेच असावे.” नेहाने केलेलं कौतुक ऐकून गुंजन खूप खुश झाली.

अशा पद्धतीने नेहाने तिच्या प्रेग्नंसीबाबत ज्या काही अफवा पसरत होत्या, त्यावर पूर्णविराम लावला आहे. मागील काही दिवसांपासून नेहा प्रेग्नेंट आहे, अशा अफवा पसरत होत्या. काही दिवसांपूर्वी तिने ‘इंडियन आयडल ११’ मधून ब्रेक घेतला होता. यानंतर सगळ्यांनी असा अंदाज लावला होता की, नेहा प्रेग्नेंट आहे म्हणून तिने ब्रेक घेतला होता. परंतु यावर तिने तिचे मत मांडले नव्हते. आता तिने पहिल्यांदा तिचे मत व्यक्त केले आहे की, ती प्रेग्नेंट नाही आणि तिचा याबाबत कोणताही प्लॅन नाही.

नेहा मागील काही दिवसांपासून तिचे ‘कांटा लगा’ या गाण्यामुळे खूप चर्चेत आहे. तिचे हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या गाण्याला नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांनी त्यांचा आवाज दिला होता. या गाण्याला आतापर्यंत ७५ मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आनंद गगनात मावेना! आधी बॉलिवूडमध्ये पदार्पण अन् आता ‘मल्टीप्लेक्स’चा मालक बनलाय विजय देवरकोंडा

-कपाळावर कुंकू लावून तुरुंगातून बाहेर निघाला राज कुंद्रा, ६४ दिवसांनी मिळाला जामीन

-‘मला दिव्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले’, नेहाच्या वक्तव्यावर विजेतीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हे देखील वाचा