Saturday, June 29, 2024

गाना कॉपी करे…इथपर्यंत ठिक आहे भाऊ!! पण कपड्यांचीही कॉपी ? ते पण लग्नात…

नुकताच बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या या विवाहाची प्रत्येक बातमी अगदी रोक्यापासून ते लग्नापर्यंत प्रेक्षकांनी आवर्जून मिळेल त्या माध्यामातून जाणून घेतली. दिनांक २४ ऑक्टोबर रोजी या दोघांनी सात फेरे घेत साताजन्माच्या गाठी बांधल्या. त्यामुळे सध्या त्यांच्या या विवाहाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. मात्र, यात एका गोष्टीची खुपच चर्चा होताना दिसत आहे, ती म्हणजे वधू राणी म्हणजे नेहाने लग्नात पेहराव केलेले कपडे. असं म्हटलं जातंय की बॉलिवूडच्या या लोकप्रिय गायिकेने तिच्या लग्नात बॉलिवूडमधल्याच काही अभिनेत्रींना कॉपी करुन लग्नातील कपड्यांची निवड केली आहे. आणि यावरूनच तिला सध्या मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील केले जात आहे.

सध्या सोशल मीडियावर नेहाच्या लग्नातील अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यात तिच्या हळदी समारंभापासून ते लग्नानंतरच्या भेटीगाठीच्या कार्यक्रमापर्यंतचे अनेक फोटो आहेत. त्यामुळेच फॅन्सने तिचे हे फोटो पाहून, नेहाने लग्नातील कपडे डिझाइन करताना अभिनेत्री अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांना कॉपी केले असल्याचे म्हटले जात आहे.

नेहाचा लेहंगा हुबेहूब प्रियांकाच्या लेहंगाप्रमाणे…

यात, सर्वप्रथम नेहाने परिधान केलेला लाल रंगाचा लेहंगा हा हुबेहूब अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या वेडिंगमधील लेहंग्याप्रमाणेच दिसत आहे. त्यामुळे नेहाने हा लेहंगा डिझाइन करताना प्रियांकाला कॉपी केल्याचे म्हटले जात आहे.

लग्नात अनुष्काच्या लेहंग्याची कॉपी…?

यानंतर रोहनप्रीत आणि नेहा यांनी गुरुद्वारामध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केले. तेव्हा तिने तिथे परिधान केलेला लेहंगा हा अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लेहंग्याप्रमाणेच दिसत होता.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लग्नात अनुष्काने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तेव्हा तिच्या त्या लेहंग्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे, अनुष्काच्या त्या लेहंग्याला आठवत नेटकरी नेहाने तिच्या लग्नात परिधान केलेला लेहंगा अनुष्काची कॉपी असल्याचे म्हटले जात आहे.

उरलं सुरलं इथेही कॉपी …?

यानंतरचा प्रसंग म्हणजे रिसेप्शन म्हणजेच लग्नानंतर भेटीगाठीचा कार्यक्रम. असं म्हटलं जातंय की, नेहाने तिच्या वेडिंग रिसेप्शनच्या पार्टीमध्ये पांढऱ्या रंगाचा लेहंगा परिधान केला तो लेहंगा आणि तिचा एकंदरीत लूक हा हुबेहून दीपिका पादुकोणप्रमाणे भासत होता. दीपिकाने तिच्या रिसेप्शन पार्टीमध्येदेखील असाच पेहराव केला होता.

खरेतर कपडे कोणी कोणती घालावी, हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा भाग असतो. त्यामुळे नेहाने जरी कॉपी केलं असेल किंवा नसेल तरी त्यावर बोंबाबोंबला कोणताही आक्षेप नाही. परंतू, नेटकरी मात्र तीला ट्रोल करायचं काही सोडत नाहीत. आता, यावर नववधू नेहा काही बोलणार की चाहत्यांना दुर्लक्षित करणार हे पाहावे लागेल. तोपर्यंत आपण नेहा आणि रोहनप्रित या नवीन जोडप्याला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊयात.

हे देखील वाचा