Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्रेग्नंसीच्या चर्चांमध्ये नेहा कक्करचा मोठा निर्णय; या कारणामुळे ‘इंडियन आयडल’च्या फिनालेमध्येही नाही दिसणार गायिका

‘इंडियन आयडल’ हा शो टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध सिंगिंग शो आहे. सध्या या शोचे १२ वे पर्व सुरु आहे. मागील काही महिन्यांपासून सुरु असणारे हे पर्व आता त्याच्या अंतिम टप्यात आले आहे. येत्या १५ ऑगस्टला या शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या ग्रँड फिनालेकडे लागले आहे. कोण होणार इंडियन आयडल या मोठ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लवकरच मिळणार आहे. एकीकडे या ग्रँड फिनालेच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे या शोच्या फिनाले भागात तरी नेहा कक्कर हजेरी लावणार की नाही? प्रश्न उपस्थित होत आहे.

जेव्हा महाराष्ट्रात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत होती, तेव्हा शुटिंगवर बंदी आणली गेली. त्याचमुळे या शोची शूटिंग दमणमध्ये सुरु झाली. त्यामुळे नेहाने दमणला जाण्यास नकार दिला होता. मात्र कोरोनाची संख्या कमी झाल्यानंतर जेव्हा शोची शूटिंग मुंबईत सुरु झाली, तेव्हा देखील नेहा या शोमध्ये दिसली नाही. तिला तिची बहीण सोनू कक्करने रिप्लेस केले असून, आताही नेहाच्या जागी सोनूच दिसते. पण आता मिळालेल्या माहितीनुसार, नेहा या शोच्या फिनाले भागातही दिसणार नाही. त्यानंतर तिला बाहेर स्पॉट करण्यात आले. तेव्हा सोशल मीडियावरील फोटोंवरून ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा होत आहेत. (Neha Kakkar will not be a part of Indian Idol 12 finale )

एका वृत्तानुसार, नेहा मागील बऱ्याच काळापासून इंडियन आयडलमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे. मात्र आता ती कामातून ब्रेक घेत आहे. आता नेहा स्वतःला वेळ देऊ इच्छिते. खूप मेहनतीनंतर तिने हे स्थान मिळवले आहे. आता तिला तिच्या नवऱ्याला रोहनप्रीत सिंगला वेळ द्यायचा आहे. त्यामुळे ती आता शोमध्ये दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बातम्यांवर अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाहीये.

पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सायली कांबले, शण्मुखप्रिया, मोहम्मद दानिश आणि निहाल या सहापैकी पाच स्पर्धकांमध्ये फायनल लढत होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यूट्यूबवर ‘जालिमा कोका कोला’ गाण्याने केला राडा! नोरा फतेहीच्या डान्सने पुन्हा एकदा जिंकली प्रेक्षकांची मनं

-दीपिकाने अंगावर काटा आणणारा, भयावह व्हिडिओ केला शेअर; नेटकऱ्यांकडून आगामी चित्रपटाबद्दल लावला जातोय अंदाज

-व्हायरल व्हिडिओला प्रतिक्रिया देत, धर्मेंद्र यांनी नातू करण देओलचे केले कौतुक; म्हणाले, ‘तू तुझ्या पंजीसारखा…’

हे देखील वाचा