Monday, July 1, 2024

नेहा कक्करचा ‘खड तैनू मैं दस्सा’ गाण्यावर जबरदस्त भांगडा, पती रोहनप्रीतनेही केली भन्नाट कमेंट

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका जिने तिच्या आवाजाने सर्वांना अक्षरशः वेड लावले आहे. ती म्हणजे नेहा कक्कर. ती एक गायिकासोबत एक उत्कृष्ट परफॉर्मर देखील आहे. याचा अंदाज आपल्याला तिच्या म्युझिक व्हिडिओमधून आला आहे. नेहा कक्करने गायलेली सगळीच गाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तिचे सोशल मीडियावर चांगले फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे तिची गाणी खूप लोकप्रिय होतात. अशातच नेहा कक्कर तिच्या चाहत्यांसाठी ‘खड तैनू मैं दस्सा’ हे पंजाबी गाणे घेऊन आली आहे. तिचे हे गाणे सुपरहिट झाले आहे. आता तिचा या गाण्या वरचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नेहा कक्कर या गाण्यावर भांगडा डान्स करताना दिसत आहे. तिने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिने या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. यामध्ये तिने जांभळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचा प्लाझो घातला आहे.

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “मी बोट रॉकर्ससोबत इथे माझ्या आवडीचे गाणे ऐकत आहे.” या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नेहा एका कंपनीची जाहिरात करत आहे. तिच्या या व्हिडिओला 3 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओचे कौतुक करत तिचा पती रोहनप्रीत याने देखील कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “हाहाहा आय लव्ह यू एँड योर भांगडा डान्स.”

‘खड तैंनू मैं दस्सा’ हे गाणे नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनी गायले आहे. रजत नागपाल यांनी या गाण्याला संगीत दिले आहे, तर ‘कप्तान’ यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहेत. अगम अजीम यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. हे गाणे देशी म्युझिक फॅक्टरीवर प्रदर्शित केले आहे. या आधी नेहा आणि रोहनप्रीत हे ‘तू अपना ख्याल रखीया कर’ आणि ‘नेहू दा व्याह’ यामध्ये एकत्र दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा