फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. चॉकलेट डे, रोज डे, प्रपोज डे असे अनेक डे या महिन्यात साजरे केले जातात. शेवटी 14 तारखेला वॅलेंनटाईन डे दिवशी प्रत्येकजण आपल्या खास शैलीत आपले प्रेम व्यक्त करत असतो. यामध्ये मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री सुद्धा मागे नाहीत. अभिनेत्री नेहा महाजननेही वॅलेंनटाईन डे दिवशी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोण आहे नेहाचा प्रियकर चला जाणून घेऊ.
नेहा महाजन मराठी चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर तिने मराठी चित्रपट जगतात चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. सध्या नेहा महाजनच्या इंस्टाग्रामवरील पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. नेहाने वॅलेंनटाईन डे दिवशी आपल्या प्रेमाची कबुली देत बॉयफ्रेंड ब्रॅडली ड्युन्ससोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये दोघांनी सोबत घालवलेले सुंदर क्षण दाखविण्यात आले आहेत. या व्हायरल व्हिडिओची सध्या चर्चा सुरू आहे. व्हिडिओमध्ये नेहा आपल्या बॉयफ्रेंडसोबत मस्ती करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. नेहाने या व्हिडिओ सोबत ड्युन्सला खास शैलीत वॅलेंनटाईन डे च्या शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. नेहाच्या चाहत्यांना हा व्हिडिओ आवडला असून त्यांनी जोरदार प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
अभिनेत्री नेहा महाजनने ‘कॉफी अँड बरेच काही’ , ‘नीळकंठ मास्तर’ , ‘वन वे तिकीट’ , अशा गाजलेल्या मराठी चित्रपटात काम केले आहे. चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. नेहाने सिंबा या हिंदी चित्रपटातही काम केले आहे.
हेही वाचा –
- ‘जर तुम्ही भाग्यवान असाल, तर…’, म्हणत ऋता दुर्गुळेने प्रतिकसाठी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने लिहिली रोमॅंटिक पोस्ट
- ‘लव्ह हॉस्टेल’चा ट्रेलर प्रदर्शित, बॉबी देओलच्या क्रूर आणि दमदार भूमिकेने वेधले सर्वांचे लक्ष
- राज कपूर यांनी स्वभावाने लाजाळू असणाऱ्या दिलीप कुमार यांची ‘अशी’ घेतली फिरकी, वाचा भन्नाट किस्सा
- हे ही पाहा :










