Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड ‘मी तिचे सिनेमे बघत नाही कारण…’, म्हणत ‘या’ अभिनेत्रीने सांगितले अनन्या पांडेचे सिनेमे न बघण्याचे कारण

‘मी तिचे सिनेमे बघत नाही कारण…’, म्हणत ‘या’ अभिनेत्रीने सांगितले अनन्या पांडेचे सिनेमे न बघण्याचे कारण

 

अनेकदा आपण सोशल मीडियावर कलाकारांचे शाब्दिक वाद आणि टिकासत्र बघतो.यात अभिनेत्री देखील मागे नाही. अनेक अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून येत कलाकारांवर टीका करताना दिसतात. अशातच अभिनेत्री आणि मॉडेल नेहा शर्माने अनन्या पांडेवर एक वक्तव्य केले आहे. त्या वक्तव्यामुळे नेहा अचानक मोठ्या प्रकाशझोतात आली. नेहाला अनन्याचे चित्रपट बघण्यात अजिबात रस वाटत नाही, म्हणून ती तिचे चित्रपट पाहत नाही. ही गोष्ट तिने एका मुलाखतीत सांगितली. ती म्हणाली की, तिच्या चित्रपटाचा ट्रेलर तिला चांगला वाटत नाही. तिला एका मुलाखतीत विचारले होते की, ‘अनन्या पांडेचे नाव घेताच तुझ्या डोक्यात काय येत?’ यावर ती म्हणाली मी प्रामाणिकपणे सांगेल की, मी जास्त चित्रपट बघत नाही. याशिवाय मला नाही वाटत की तिचा असा कोणता चित्रपट आहे, जो मला पाहवसा वाटतो. मी बघते पण मला तिच्या चित्रपटाचे ट्रेलर आवडत नाही. मी चित्रपटाचे प्रोमो आणि ट्रेलर पाहून चित्रपट बघते. ज्या चित्रपटाचे प्रोमो मला उत्साहित करतात तेच चित्रपट मी पाहायला जाते.

नेहा म्हणाली की, आतापर्यत अनन्याच्या एकाही चित्रपटाच्या प्रोमोने मला उत्साहित केले नाही, त्यामुळे मला जराही रस वाटत नाही तिचा चित्रपट पाहण्यासाठी. ती म्हणाली की, ‘ती हळू हळू पुढे जात आहे. मला माहित आहे की पुढच्या पाच वर्षात तिच्याकडे खूप काही असेल, तेव्हा मी नक्की तिचे चित्रपट बघेल. कारण त्या चित्रपटात नक्की मला काहीतरी बघायला मिळेल.’

नेहा शर्माने २०१० मध्ये इमरान हाश्मीसोबत ‘क्रूक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘ क्या सुपर कूल हैं हम’, ‘जयंतभाई की लव स्टोरी’, ‘यंगिस्तान’ आणि ‘तुम बिन 2’ यासारख्या चित्रपटात तिने कामे केली आहेत. तसेच तिचा आगामी ‘आफत ए इश्क’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला उर्फीचा आजार चढलाय काय?’ विचित्र ड्रेसमुळे काजोल आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-मोठा भाऊ घरी येण्याच्या बातमीने अबराम खान झाला भलताच खुश, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-‘अशी’ होती जामीन मंजूर झाल्यानंतर आर्यनची पहिली प्रतिक्रिया, वाचा कर्मचाऱ्यांसह कैद्यांना काय म्हणाला?

हे देखील वाचा