लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहे बंद आहेत. अशावेळी ओटीटी प्लॅटफॉर्मला जास्त प्राधान्य दिले जात आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांकडूनही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटला विशेष प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वेब चित्रपट असो वा वेबसिरीज, यांची लोकप्रियता तर या दिवसांत शिगेला पोहचत आहे. अशीच एक लोकप्रिय वेबसिरीज आहे ‘मनी हाईस्ट’, ज्याच्या पाचव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
नेटफ्लिक्सची लोकप्रिय आणि मेगाहिट क्राइम-ड्रामा सिरीज ‘मनी हाईस्ट’ला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. नेटफ्लिक्सवर आतापर्यंत ‘मनी हाईस्ट’चे ४ सीझन आले आहेत. अशामध्ये आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या लोकप्रिय सिरीजचा पाचवा सीझनची रिलीझ डेट समोर आली आहे. नेटफ्लिक्सने ट्विटरवर केलेल्या घोषणेनुसार या सिरीजचा शेवट या पाचव्या सिरीजने होणार आहे.
असे म्हटले जात होते की, या सिरीजचा पाचवा सीझन ऑगस्टमध्ये रिलीझ होईल, पण आता हा सीझन ३ डिसेंबरला रिलीझ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच वेळी, ट्विस्ट असे आहे की, या वेळी हा फायनल सीझन दोन भागात दाखवण्यात येईल. पहिला भाग ३ सप्टेंबरला, तर दुसरा भाग ३ डिसेंबरला रिलीझ करण्यात येईल. नेटफ्लिक्सने ट्विटरवर याची माहिती दिली आहे.
ARE YOU READY FOR THE FINAL FACE-OFF ????????????
Money Heist Part 5:
????Volume 1 – September 3
????Volume 2 – December 3
????????????????????????#MoneyHeist5 pic.twitter.com/ffQty0jXre— Netflix India (@NetflixIndia) May 24, 2021
फ्लॉप ठरला होता शो!
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवणारा हा शो अगोदर फ्लॉप झाला होता. होय, जेव्हा हा शो स्पॅनिश टीव्हीवर सर्वप्रथम दाखवला गेला, तेव्हा तो फ्लॉप झाला होता. निर्मात्यांनी लगेचच दुसऱ्या सीझननंतर याला बंद करण्याचा निर्णय घेतला होता. नंतर नेटफ्लिक्सने हा शो विकत घेतला आणि याला प्रचंड यश मिळाले. तसेच, सुरुवातीला याची जाहिरात देखील करण्यात आली नव्हती. हळूहळू या शोची लोकप्रियता वाढत गेली आणि याला केवळ युरोपमधूनच नव्हे, तर जगभरातून पसंती मिळाली.










