Saturday, May 4, 2024

Cobalt Blue | दिग्दर्शकाला मिळालं नाही कसलंही श्रेय, उलट करण्यात आली कारवाई; धक्कादायक प्रकार आला उघडकीस

सचिन कुंडलकरचा बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपट ‘कोबाल्ट ब्लू’ अखेर गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. प्रतीक बब्बर आणि निलय मेहंदळे अभिनीत हा चित्रपट कोणत्याही प्रमोशन किंवा मार्केटिंगशिवाय प्रदर्शित झाला. हा चित्रपट २००६ मध्ये सचिन कुंडलकर यांच्या त्याच नावाच्या मराठी कादंबरीवर आधारित आहे. पण रिलीझ झाल्यानंतर त्याच्या दिग्दर्शकाचे नाव जाणून घेणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरले आणि त्यावर चर्चा सुरू केली.

दिले नाही दिग्दर्शकाला श्रेय
आश्चर्याची बाब म्हणजे, या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे श्रेयही कुंडलकर यांना देण्यात आलेले नाही. चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिग्दर्शकाला कुठेही श्रेय दिलेले नाही. जेव्हा प्रेक्षकांनी चित्रपट पाहिला आणि असे का केले असे प्रश्न उपस्थित केले, तेव्हा असे आढळून आले की ‘नेटफ्लिक्सने कुंडलकरला मार्चमध्ये चित्रपटातून माघार घेण्यास सांगितले होते’. विशेष म्हणजे त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावण्यात आले होते. (netflix takes action against cobalt blue director sachin kundalkar)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
रिपोर्ट्सनुसार, ओटीटी प्लॅटफॉर्मने २०१८ मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. २०२१ पर्यंत हा चित्रपटही तयार झाला होता. पण चित्रपट पूर्ण झाल्यानंतर, २०२१ च्या अखेरीस, क्रू मेंबरने नेटफ्लिक्स टीमकडे तक्रार केली की कुंडलकरने तिच्यावर बलात्कार केला आहे.

…म्हणून झाला रिलीझला उशीर
ओटीटी प्लॅटफॉर्मच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अंतर्गत समिती स्थापन केली. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. पण नेटफ्लिक्स या प्रकल्पाबाबत साशंक होते त्यामुळेच ते वारंवार चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलत होते. चौकशीअंती कुंडलकर यांचा या प्रकल्पाशी कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचा निर्णय घेण्यात आला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा