Tuesday, December 23, 2025
Home बॉलीवूड राधिका आपटेचा ‘तो’ बोल्ड फोटो पाहून संतापले नेटकरी, अभिनेत्रीला बॉयकॉट करण्याच्या मागणीने धरला जोर

राधिका आपटेचा ‘तो’ बोल्ड फोटो पाहून संतापले नेटकरी, अभिनेत्रीला बॉयकॉट करण्याच्या मागणीने धरला जोर

टेलिव्हिजनवर कलाकार जी पात्र निभावतात , त्याच पात्राच्या नावाने त्यांची आयुष्यभरासाठी प्रचंड ओळख निर्माण होते. तसेच अनेक अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यामुळे सतत चर्चेत असतात. अशीच बाॅलिवूडची मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे कोणाला माहित नाही, असं होणार नाही. ती सतत तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी राधिका आपटे तिच्या चित्रपटामुळे नाही, तर जुन्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

अनेक सोशल मीडिया युजरने आरोप केला आहे की, राधिका आपटे तिच्या फोटोमुळे अश्लीलता पसरवत आहे आणि भारतीय संस्कृतीच्या विरोधात काम करत आहे. राधिकाच्या जबरदस्त अभिनयाचं आणि बोल्ड फोटोशुटचं अनेक चाहते नेहमीच कौतुक करतात. याउलट राधिका तिच्या बोल्डनेसमुळे अनेकदा वादाच्या कचाट्यात देखील सापडली आहे. सध्या ती तिच्या बोल्ड अंदाजामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. ‘#BoycottRadhikaApte’ हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर जोरदार ट्रेंड करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

https://twitter.com/YogiDevnath2/status/1425995854251393027?s=20

खरं तर राधिकाचा लीना यादव दिग्दर्शित ‘पार्च्ड’ चित्रपटातील एक जुना फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिने चित्रपटात दिलेला न्यूड सीन या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या या ट्रेंड होणाऱ्या हॅशटॅगमुळे राधिकाला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. बहुतांश नेटकरी राधिकाच्या पोस्टवर प्रतिक्रिया उमटवत आहेत. राधिकाने भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर केला जात आहे.

 

‘पार्च्ड’ या चित्रपटात बालविवाह, हुंडा प्रथा, वैवाहिक बलात्कार या सारख्या वाईट सामाजिक गोष्टीवर भाष्य केले गेले आहे. यापूर्वीही राधिकाने तिच्या एका वक्तव्यात म्हटले होते की, “पार्च्ड चित्रपटात नग्न दृश्ये देणे खूप कठीण काम होते. मी माझ्या शरीराच्या प्रतिमेबद्दल खूप नाराज होते. माझ्यासाठी हे खूप भीतीदायक होते.” त्याचवेळी, हे फोटो व्हायरल झाल्यानंतर राधिका आपटेला तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागत आहे.

राधिका लवकरच नेटफ्लिक्स ओरिजिनल ‘मोनिका’सह ‘ओ माय डार्लिंग’मध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासाबत राजकुमार राव, हुमा कुरेशी देखील मुख्य भूमिकेत असतील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनिल कपूरच्या घरात पुन्हा एकदा वाजणार सनई चौघडे, लाडकी लेक रिया लवकरच चढणार बोहल्यावर

-करीना कपूर खानला सरोगसीद्वारे हवं होत मुल, पती सैफने उघड केलं प्रेग्नेंसीपूर्वीचं ‘ते’ रहस्य

-शतक ठोकल्यानंतर सुनील शेट्टीने केली केएल राहुलची प्रशंसा; नेटकरी म्हणाले, ‘पहिल्यांदाच सासऱ्याने जावयाची…’

हे देखील वाचा