Sunday, September 8, 2024
Home मराठी दाक्षिणात्य गायिकेचे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दमदार पदार्पण

दाक्षिणात्य गायिकेचे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दमदार पदार्पण

प्रेमाच्या नावेचा संथ गतीने होणारा प्रवास अचानक आलेल्या वादळामुळे केव्हा नावेची दिशा भरकटवेल हे सांगता येणं कठीण. प्रेम ही भावना आहे आणि ती कधीही दुखावली जाऊ शकते हे सांगणारी एक अनोखी कहाणी ‘जैन फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘विरजण’ या चित्रपटातून सिनेरसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे.

प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच प्रेमालाही आहेत. प्रेम करणं ते टिकवणं आणि निभावणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत याची जाणीव या चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा ठाकरे (Actress Shilpa Thakare) आणि अभिनेता सोहम चाकणकर (Actor Soham chakankar) यांची फ्रेशजोडी करून देणार आहे. नुकताच या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पुणे येथे पार पडला.

सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक (singer anuu malik) यांच्या हस्ते या सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले. तर ‘सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन’चे डॉ. संजय चोरडिया, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे संचालक प्रवीणकुमार नाहटा, प्रदीपजी नाहर, जुगराजजी जैन, महेंद्रजी पातारे तसेच ‘विरजण’ चित्रपटातील कलाकार आणि चित्रपटाची टीम यांनी सोहळ्याला उपस्थित राहून चारचाँद लावले.

कोणत्याही कलाकृतीला भाषा, प्रातं कशाचही बंधन नसतं असं म्हटलं जातं. आणि याची पुन्हा एकदा नव्याने जाणीव तेलुगू गायिका सत्यावथी मंगली हिने करून दिली आहे. ‘विरजण’ या चित्रपटातील ‘देवा’ या गाण्याला मंगलीने सुमधुर स्वरात स्वरसाज चढवलाय. ‘देवा’ या गाण्यामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मंगली गायन क्षेत्रातील नवीन आकर्षण बनली आहे. ‘विरजण’ चित्रपटातील ‘देवा’ या गाण्याला मंगलीने आवाज देऊन मराठी सिनेविश्वात नव्याने ठसा उमटविला आहे. या गणायची जबाबदार मंगलीने उत्तमरीत्या पेलवली असून प्रशांत सातोसे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर या गाण्याचे बोल विनायक पवार लिखित आहेत. दुर्गेश राजभट्ट याने या गाण्याची म्युझिक प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे, तर संकेत टोळे याने हे गाणं मिक्स अँड मास्टर्ड केले आहे.

चित्रपटातील इतर गाणीही रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील यांत शंका नाही. ‘देवा’ या गाण्याला मिळालेल्या मंगलीच्या आवाजासह शिल्पा आणि सोहमची लव्हेबल केमिस्ट्री कशी असेल याचा अंदाज येतोय. ‘जैन फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत निर्माते सागर जैन, ऋषभ कोठारी, राजू तोडसाम निर्मित आणि दिग्दर्शक कपिल जोंधळे दिग्दर्शित ‘विरजण’ हा चित्रपट असून या चित्रपटाची कथा लेखक नितीन सूर्यवंशी यांनी लिहिली आहे. तर चित्रपटाच्या संगीताची बाजू संगीतकार प्रशांत सातोसे यांनी सांभाळली आहे, तसेच या चित्रपटाचा उत्तम असा कॅनव्हास व्यंकेट कुमार यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

‘तू आणि मी, मी आणि तू’ हे नाव असलेला चित्रपट आता ‘विरजण’ या नावाने प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटाची कथा कुठे विरजण घालणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. तर चित्रपटातील गाण्यांनी ही उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे. (new-marathi-movie-virjan-is-about-love-story-telgu-singer-mangali-debut-in-marathifilmindustry-with-soham-chakankar)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहिला दिग्दर्शकीय सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच दाक्षिणात्य दिग्दर्शक जोसेफ मनु जेम्स यांचे अल्पशा आजाराने निधन
नागराज मंजुळेंच्या नविन गाण्याने घातला धुमाकुळ…एकदा पाहाच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा