फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. फेब्रुवारी चालू झाला की प्रत्येकाला वॅलेंनटाईन डेची आतुरता लागलेली असते. रोज डे, चॉकलेट डे, प्रपोज डे, असे अनेक डे प्रेमी जोडप्यांकडून साजरे केले जातात. म्हणूनच या महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात शेवटी वॅलेंनटाईन डे साजरा करून प्रत्येकजण आपल्या खास शैलीत आपले प्रेम व्यक्त करत असतो. याच पार्श्वभूमीवर यंदाचा वॅलेंनटाईन डे आणखीन खास करण्यासाठी झी म्युझिकनेसुद्धा जोरदार तयारी केली आहे.
आपल्या नवीन ‘नको हा बहाणा’ या गाण्याच्या प्रदर्शनासाठी झी म्युझिकने वॅलेंनटाईन-डे चा मुहूर्त निवडला आहे. यंदा 14 फेब्रुवारीला झी म्युझिकच्या नवीन गाण्याचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘नको हा बहाणा’ नावाच्या या अल्बममध्ये अभिनेत्री गायत्री दातार आणि निखिल चौधरी यांचा रोमँटिक सीन पाहायला मिळणार आहे. गाण्याचे पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यामध्ये गायत्री आणि निखिल चौधरीची गोड जोडी पाहायला मिळत आहे.
निमिषा चौधरी प्रस्तुत हे बहुचर्चित ‘नको हा बहाणा’ गाणे सौरभ चौधरी यांनी दिग्दर्शित केले आहे. तर संकेत जाधव यांनी लिहलेले हे गाणे देव गाणे देव अहीरराव यांनी हे गाणे गायले आहे आणि संगीतही दिले आहे. तत्पूर्वी बिग बॉसच्या घरात गेल्यापासून अभिनेत्री गायत्री दातार सगळीकडे चर्चेत आली होती. त्याआधी तिने झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.
मालिकेतील तिच्या ईशाच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारी गायत्री आपले बोल्ड फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. या गाण्याच्या पोस्टर वरुनच गायत्रीचे दातारचे हे रोमँटिक गाणे तरुणाईला वेड लावणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे या गाण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा :