Sunday, June 1, 2025
Home टेलिव्हिजन TMKOC | शोमध्ये नवीन ‘नट्टू काका’ची एन्ट्री, आता ‘हा’ अभिनेता साकारणार आयकॉनिक भुमिका

TMKOC | शोमध्ये नवीन ‘नट्टू काका’ची एन्ट्री, आता ‘हा’ अभिनेता साकारणार आयकॉनिक भुमिका

गेल्या १४ वर्षांपासून, सर्वाधिक पाहिला जाणारा टीव्हीचा कॉमेडी शो तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltaah Chashmaah) आज घराघरात नावारूपाला आला आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या हृदयात आणि मनात घर करून आहे. दया भाभीपासून ते आत्माराम भिडे, हंसराज हाथी, बाघा आणि नट्टू काका या सर्वच व्यक्तिरेखांचे प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान आहे. आधी डॉ. हंसराज हाथी आणि नंतर जेठालालच्या दुकानात काम करणारे नट्टू काका यांचे निधन झाले, तेव्हापासून त्यांच्या सेटवर शोककळा पसरली आहे. नट्टू काकांना जाऊन नऊ महिने झाले, तेव्हापासून शोच्या सेटवर एकही नवीन चेहरा आलेला नाही.

आता बातमी अशी आहे की, शोचे निर्माते असित कुमार मोदी यांना नट्टू काकांच्या पात्रसाठी एक नवा चेहरा मिळाला आहे. आता पुन्हा एकदा नट्टू काका तुम्हाला जुन्या पद्धतीने हसवायला येणार आहेत. नुकताच असित कुमार मोदी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते आधी जेठालालच्या दुकानात जातात आणि संपूर्ण दुकानाची पाहणी करतात. मग ते म्हणतात की, हे दुकान पाहिल्यावर तुम्हाला नट्टू काकांची आठवण येत असेल. मग नट्टू काकांच्या काही जुन्या क्लिप्स सुरू होतात. (new nattu kaka s entry in taarak mehta ka ooltah chashmah)

असित मोदी सांगतात की, “नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक एक वर्ष कर्करोगाशी झुंज देत होते. त्यानंतर ३ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांचे निधन झाले. ते एक असे कलाकार होते, ज्यांना विसरता येणार नाही. पण गेल्या १३ वर्षांपासून नट्टू काकांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या धनश्याम नायकाची जागा घेणे सोपे नव्हते, पण पात्र कधीच मरत नाही.” नवीन नट्टू काकांची ओळख करून देत त्यांनी सांगितले की, “जुन्या नट्टू काकांनीच नवीन नट्टू काकांना पाठवले आहे. जसे तुम्ही त्यांना प्रेम दिले आहे, त्याचप्रमाणे यांनाही खूप प्रेम द्या.”

नवीन नट्टू काकांचे नाव किरण भट्ट (Kiran Bhatt) आहे. किरण भट्ट एक प्रसिद्ध गुजराती अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक आहेत. ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून सब टीव्हीवर प्रसारित होत आहे. सर्वप्रथम दिशा वकानीने (Disha Vakani) या शोला अलविदा केला, त्यानंतर जुनी अंजली भाभी म्हणजेच नेहा मेहताने (Neha Mehta) शो सोडला. काही दिवसांपूर्वी तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढाही (Shailesh Lodha) शोमध्ये दिसत नाही. त्यांनीही शोचा निरोप घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

हे देखील वाचा