Wednesday, July 3, 2024

‘हा’ स्पर्धक ‘बिग बॉस ओटीटी’चा नवीन सीरियल किसर; नेहा अन् शमिताला केले किस

‘बिग बॉस’ ओटीटीच्या घरात रोज काही ना काही घडत असते. कधी स्पर्धकांमध्ये समीकरणं बदलतात, तर कधी कनेक्शनमधील बाँडिंग बदलताना दिसतात. एक दिवसापूर्वीच प्रतिक सेहजपाल आणि अक्षरा सिंग, जे घराचे सर्वात मजबूत कनेक्शन मानले जात होते. ते एकमेकांपासून वेगळे झाले आहेत, तर राकेश बापटचे शमिता शेट्टीवरील प्रेम दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. आपल्या पहिल्याच पदार्पण चित्रपट ‘तुम बिन’मध्ये रोमँटिक हिरो म्हणून दिसणारा राकेश सध्या बिग बॉसच्या घरातही त्याच अवतारात दिसत आहे. राकेश हा घरातील ‘सीरियल किसर’ बनला आहे. अक्षरा सिंग, शमिता शेट्टीनंतर आता राकेश नेहा भसीनला किस करताना दिसत आहे.

‘बिग बॉस’च्या १५ व्या सिझनचे २४ तास थेट प्रक्षेपण सुरू आहे. त्याचबरोबर प्रेक्षक त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना प्रत्येक वेळी पाहू शकतात. अशा स्थितीत राकेश नेहमीप्रमाणे सकाळी लवकर गुड मॉर्निंग किस देताना दिसला. राकेश आणि शमिता एक कनेक्शन म्हणून घरात शिरले आहेत आणि त्यांच्यातील कनेक्शन देखील खूप खास आहे.

मात्र, दुसरीकडे राकेश नेहा भसीनला गुड मॉर्निंग किस करत झोपेतून उठवत असताना दिसला. बिग बॉसच्या घरात राकेश बापट नवीन रोमँटिक हिरो म्हणून उदयास आला आहे. राकेश आणि शमिता यांच्यातील जवळीक दिवसेंदिवस वाढत आहे. घरात कितीही ड्रामा आणि गोंधळ चालू असला, तरीही राकेश आपले प्रेम दाखवण्यात कमी पडत नाही. (New Serial Kisser Rakesh Bapat is making a fuss in the house of Bigg Boss)

काही दिवसांपूर्वी राकेश बापट रात्री उशिरा शमितासोबत फ्लर्ट करताना दिसला होता. इतकेच नव्हे, तर राकेशने शमिताला घरात ‘बाळ’ म्हटले होते. या दोघांचे हे सुंदर बाँडिंग पाहून प्रेक्षक खूप आनंदी आहेत. एक दिवस आधी, बिग बॉसने कुटुंबातील सदस्यांना कनेक्शन बदलण्याची संधी देखील दिली होती, परंतु राकेश आणि शमिता यांनी त्यांचे कनेक्शन बदलले नाही.

त्याचबरोबर मंगळवारी (२४ ऑगस्ट) घरात नामांकन नॉमिनेशन टास्क झाले आणि याचदरम्यान राकेश- शमिता, प्रतीक- नेहा आणि मिलिंद- अक्षरा यांना घरात नॉमिनेट करण्यात आले आहे. परंतु राकेश आणि शमिताचे कनेक्शन नॉमिनेशनपासून जनतेने वाचवले हे बुधवारी (२५ ऑगस्ट) लाईव्ह प्रेक्षपणात स्पष्ट झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात

-तब्बल ३६ वर्षांपूर्वी ‘या’ जाहिरातीत दिसला होता ‘भाईजान’; हँडसम लूक पाहून चाहते नव्याने पडतायेत प्रेमात

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

हे देखील वाचा