देशातील आघाडीच्या रेडिओ नेटवर्कपैकी बीग एमएमवर गेले अनेक महिने सुरू असलेल्या ‘सुहाना सफर विथ अनु कपूर’ या शोला देशभरातील लाखो चाहत्यांचे प्रचंड प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. त्यानंतर ते बीग एमएम मराठीमध्ये एक शो घेऊन आले आहेत. पुण्यातील आपल्या उत्कट मराठी श्रोत्यांसाठी यापुर्वीच्या यशस्वी शोच्या संकल्पनेवर आधारित बीग एफएम ‘बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे’ हा शो सादर करत आहे. ज्यामध्ये अष्टपैलू भारतीय अभिनेत्यांचे विविध पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे. सोमवार ते शनिवार पुण्यात ९५ बिग एफएम वर आणि उर्वरित महाराष्ट्रात ९२. ७ बिग एफएम नागपूर व मुंबई वगळता रोज संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत हा शो प्रसारीत केला जाणार आहे. नागपूर आणि गोव्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी ७ ते ८ हा शो प्रसारित होईन तसेच मुंबई मध्ये दर रविवारी ५ ते ६ या वेळेत हा शो प्रसारित करण्यात येईल.
‘धुन बदल के तो देखो’ या ट्यूनवर आधारित असलेला हा शो श्रोत्यांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीबद्दलची उत्कट भावना जागृत करून, सुबोध भावे हे सेलिब्रिटी पाहुण्यांशी संवाद साधतील. देशातील सर्वात जुन्या चित्रपट उद्योगाच्या वारशाची, इतिहासातील अभिनेत्यांच्या आकर्षक गोष्टी, याआधी कधीही न ऐकलेल्या बाबी यावर संवाद साधला जाणार आहे . या शोमध्ये लोकप्रिय भारतीय अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक यांचा समावेश असणार आहे. जे मराठी चित्रपट, थिएटर आणि टीव्ही मालिकांमध्ये त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. या कथा इंटरनेटवर सहज उपलब्ध नसलेल्या व अस्सल संशोधनावर आधारित असणार आहे. या शोचे प्रस्तुत प्रायोजक हे लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि आहे.
बीग एफएमचे चीफ ब्रँड आणि डिजिटल ऑफिसर सुनील कुमारन शो आणि सुबोधबद्दल बोलताना म्हणाले की, “आपल्या प्रतिभावान कलाकारांच्या निष्ठेने समर्पण प्रयत्नांमुळे मराठी चित्रपट सृष्टीने अनेक दशकांपासून जगभरात आपले स्थान निर्माण केले आहे. या कलाकारांचा प्रत्येक चित्रपट हा चित्रपट सृष्टीत ठसा उमटवणारा आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केले आहे त्यांच्याकडे नागरिकाना सांगण्यासाठी आणि प्रेक्षकांना प्रेरणा देण्यासाठी असंख्य कथा आहेत. इतके दिवस इंडस्ट्रीचा एक भाग असल्याने मराठी चित्रपटांबद्दलच्या मनोरंजक आणि मजेदार घटना, माहिती आणि तथ्ये श्रोत्यांसह सामायिक करण्यासाठी सुबोध योग्य व्यक्ती आहे.”
शोबद्दलचा उत्साह शेअर करताना सुबोध भावे म्हणाले की, “मी बीग एफएम कुटुंबाचा एक भाग बनून आनंदीत आहे. रेडिओ होस्ट म्हणून हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांवर प्रकाशझोत टाकणारा शो करणे हा माझ्यासाठी खूप मोठा विशेषाधिकार आहे. हा शो आणि बीग एफएम हे माझ्यासाठी श्रोत्यांशी संवाद साधण्यासाठी आणि मराठी चित्रपटांच्या अनेक आकर्षक पण न सांगितलेल्या कथा मांडण्यासाठी एक अद्भुत व्यासपीठ आहे. या कथांकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन याव्यक्त होईल.”
आता या शोला श्रोत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!