Sunday, October 19, 2025
Home व्हिडीओ ‘कच्चा बदाम’नंतर आता ‘हा’ लिंबू सरबत विक्रेता झालाय रातोरात स्टार, कला पाहून व्हाल चकित

‘कच्चा बदाम’नंतर आता ‘हा’ लिंबू सरबत विक्रेता झालाय रातोरात स्टार, कला पाहून व्हाल चकित

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. सोशल मीडियाच्या या जगात कोण कधी व्हायरल होईल आणि रातोरात स्टार होईल याचा काही भरवसा नाही. सोशल मीडियावर सध्या रोज एक नवीन ट्रेंड येत असतो आणि रोज एक कलाकार रातोरात स्टार होत असतो. अगदी रोज मजुरी करुन आपली गुजरान करणारेही अनेक लोकं या सोशल मीडियाच्या करामतीने कोट्याधीश झाले आहेत. काही दिवसांपूर्वी ‘कच्चा बदाम’ गाण्याने नेटकऱ्यांना वेड लावले होते. लाखो हजारो रिल्स या गाण्यावर तयार करण्यात आले होते. हा ट्रेंड संपतोय न संपतोय तोच आता आणखी एका लिंबू सरबत बनवणाऱ्या पंजाबी व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यामध्ये एक पंजाबी व्यक्ती त्याच्या खास शैलीत लिंबू सरबत बनवत आहे. हे बनवत असताना तो मजेशीर गाणे गात त्याची सगळी प्रक्रिया गाण्यातून सांगत आहे. विक्रेत्याची ही गाण्याची स्टाईल आणि त्याची ही सरबत बनवण्याची अनोखी स्टाईल, त्याची कौशल्ये पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. ज्या प्रकारे तो ग्लास हाताळतो आणि करामती करत करत पाहणाऱ्यांना समजायच्या आत तो कृती करत आहे. ज्यामुळे समोर बघणारेही धक्क होत आहेत. त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत सात लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

दरम्यान याआधीही असे अनेक अतरंगी कलाकार सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. ज्यामध्ये रेल्वे स्टेशनवर भीक मागणाऱ्या राणू मंडलची सर्वात जास्त चर्चा झाली होती. इक प्यार का नगमा हे तिने गायलेले गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या गाण्याने थेट तिला बॉलिवूड स्टार हिमेश रेशमियासोबत गाणे गायची संधी मिळाली होती. त्याचप्रमाणे कच्चा बदाम गाण्यानेही रस्त्यावर बदाम विकणाऱ्या सामान्य व्यक्तीला रातोरात स्टार केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा