दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नितीन आणि कीर्ती सुरेश यांचा ‘रंग दे’ हा चित्रपट होळीच्या निमित्ताने रिलीज झाला आहे. शुक्रवारी हा चित्रपट सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. वेंकी एटलुरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळत आहे. अनेक जणांना या चित्रपटातील क्लायमॅक्स खूपच आवडला आहे. या चित्रपटात काही भावनिक सीन देखील आहे. या सीनकडे सर्वजण खूपच आकर्षित झालेले दिसतात.
या चित्रपटाचे निर्माते नागा वामसी यांनी असे म्हटले की, “मला विश्वास आहे येत्या आठवड्यात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल.” वामसी यांनी सी सी टीव्ही एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
रंग दे या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल सांगताना अभिनेता नितीन म्हणाला की, “पडद्यावर हा यंग रोल निभावताना मला खूप भीती वाटत होती. परंतु मला आनंद आहे की, हा चित्रपट बघितल्यानंतर सगळ्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळेल.”
या चित्रपटातील नितीन आणि कीर्तीची केमिस्ट्री सगळ्यांना खूपच आवडली आहे. नितीनने नंतर सांगितले की, “सणाचे दिवस आहेत, तुमच्या परिवारासोबत तुम्ही रंग दे हा चित्रपट पाहा आणि तुमचा सण आनंदाने साजरा करा. मला खात्री आहे की, सगळेजण खूप प्रेम देतील आणि रंग दे हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघतील.”
हा चित्रपट एक कॉमेडी ड्रामा आहे. या चित्रपटातदेखील नितीन आणि कीर्तीने खूप धमाल केली आहे. या दोन्ही स्टार्सने सोशल मीडियावर चित्रपटाचे प्रमोशन केले होते. त्यांच्या या चित्रपटातला खूपच चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज
-‘खूप भारी दिसतेय’, हिना खानच्या समुद्रावरील ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची कमेंट
-हिना खानच्या हॉट अंदाजावर चाहत्यांसह सेलिब्रिटीही फिदा! कमेंट्स करत केले अभिनेत्रीचे कौतुक