Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिज्ञा एन्जॉय करतेय मेहंदी समारंभ! पाहा कधी करणार लग्न

२०२० च्या शेवटच्या दोन तीन महिन्यांपासून प्रत्येक ठिकाणी लगीनघाई सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतेय. जे या नव्या वर्षात २०२१ मध्ये देखील कायम राहणार आहे. नव्या वर्षी २०२१ मध्ये मराठी सिनेसृष्टीतील सोनाली कुलकर्णी, अभिज्ञा भावे, मानसी नाईक, सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे कलाकार लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. (ठरलं होतं मागच्या वर्षी, परंतू आता २०२१मध्ये मराठीतील ‘या’ जोड्याने करणार धडक्यात लग्न) या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आपल्याला यापैकी किमान दोन तरी लग्न पाहायला मिळणारच आहेत अशी आशा आहे. त्यापैकी एक म्हणजे मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारीला होणार आहे. तर हळू हळू अभिज्ञा भावेच्या लग्न समारंभातील लग्न साईमांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मुळात अभिज्ञा भावे हिच्या मेहंदी समारंभाचे फोटो व्हायरल झाले आहेत. अभिज्ञाने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केल्याचं दिसत आहे. तिच्या दोन्ही हातांवर वैविध्यपूर्ण पद्धतीने नक्षीकाम मेहंदीचा वापर करून करण्यात आलं आहे. यामध्येच मेहंदी हातावर काढत असताना अभिज्ञाने काही बुमरँग व्हिडियो सुद्धा चित्रित करून शेअर केले आहेत. ज्यांनासुद्धा तिच्या चाहत्यांकडून पसंती मिळतेय.

अभिज्ञा आणि मेहुल लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. मागच्याच वर्षी ऑक्टोबर मध्ये या दोघांनीही घरच्यांच्या उपस्थितीत साखररपूडा केला होता. यावेळी फक्त दोघांचेही कुटुंबीय आणि मित्रवर्गच उपस्थित होते. मेहुल पै हा एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा मालक आहे. तर अभिज्ञाने सुद्धा २०१० पासून प्यार की ये एक कहानी या हिंदी मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तुला पाहते रे, खुलता कळी खुलेना, रंग माझा वेगळा या काही मराठी मालिकांमध्ये अभिज्ञाने काम केलं आहे आणि या प्रत्येक मालिकेमध्ये तिने नकारात्मक भूमिकाच साकारल्या आहेत. ज्यासाठी अभिज्ञा प्रसिद्ध झाली.

आपल्याला ठाऊक आहे अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अभिज्ञा ही हवाई सुंदरी होती. ते क्षेत्र सोडून तिने अभिनय क्षेत्र निवडलं ज्यात ती बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसतेय. मेहुल पै सोबत होत असलेलं लग्न हे अभिज्ञाचं दुसरं लग्न आहे. २०१४ मध्ये अभिज्ञाचा विवाह वरूण वैटिकर याच्याशी झाला होता त्यानंतर कालांतराने हे दोघेही विभक्त झाले होते.

हे देखील वाचा