Saturday, June 29, 2024

महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेताना दिसले मिस्टर ऍंड मिसेस टिळक, चाललीये त्यांच्या देवदर्शनाची चर्चा

नुकतेच काही दिवसांपूर्वी अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे हे लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाच्या आधीपासूनच त्यांचे संगीत, मेहेंदी आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर नुसते धुमाकूळ घालत होते. सर्वत्र केवळ सुयश आणि आयुषी यांच्या लग्नाच्या चर्चा चालू होत्या. काही महिन्यांपूर्वी आयुषी आणि सुयश यांचा साखरपुडा झाला होता. तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली होती. तेव्हापासूनच सगळे त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत होते. अशातच टिळक जोडप्याने देवदर्शन घेतले आहे. देवदर्शनाचे काही फोटो सुयश आणि आयुषी यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सुयशने नुकतेच इंस्टाग्रामवर त्यांचे फोटो शेअर केले आहेत. ते दोघेही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. या फोटोमध्ये आपण बघू शकतो की, आयुषीने निळ्या रंगाची साडी नेसली आहे, तर सुयशने निळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. महालक्ष्मीच्या मंदिरा बाहेर उभे राहून त्यांनी हे फोटो काढले आहे. दोघांनीही कपाळाला गुलाल लावला आहे. तसेच खांद्यावर पिवळ्या रंगाचे वस्त्र घेतले आहे. तसेच आयुषीने गळ्यात मंगळसूत्र आणि नाकात नथ घातली आहे. ती अगदी नव्या नवरीच्या वेशात दिसत आहे. (newly married tilak couple goes for devdarshan after marriage)

हे फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “जोतिबाच्या नावानं चांगभलं, श्री अंबाबाई, महालक्ष्मी कोल्हापूर.” त्यांच्या या फोटोवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत, तर काहीजण त्यांच्या या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.

सुयश आणि आयुषीने त्यांच्या नात्याबाबत खूप गुप्तता पाळली होती. त्यांनी अचानक साखरपुडा करून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्या दोघांनी आयुषीच्या वाढदिवशी त्यांचा साखरपुडा केला होता. साखरपुड्याच्या वेळेस जोडप्याने साऊथ इंडियन लूक केला होता, तर लग्नाच्या वेळेस दोघेही अस्सल मराठमोळ्या लूकमध्ये दिसत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचा सोशल मीडियासंदर्भात मोठा निर्णय; वाचून तुम्हीही कराल कौतुक

-‘मला तुमच्याशी लग्न करायचे आहे’, रुपाली भोसलेचे सौंदर्य आणि सोज्वळता पाहून चाहताही झाला वेडा

-‘आमच्या अब्रूची लख्तरे चारचौकात उधळली जात आहे’, म्हणत क्रांती रेडकरने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

हे देखील वाचा