देशभरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज लोक या विषाणूच्या सापळ्यात अडकताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोनाला बळी पडले होते. पण योग्य ते उपचार घेत, ते यातून सुखरूप बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत, रुग्णालयाच्या बाहेर त्यांचा आवडता कलाकार पाहिल्यानंतर त्यांचे चाहते कायमच अस्वस्थ होत असतात. नुकतीच कॅटरिना कैफ कोरोनातून मुक्त झाल्यावर रुग्णालयाच्या बाहेर दिसली होती.
यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगणही मुंबईतील रुग्णालयाच्या बाहेर स्पॉट झाला आहे. ज्यानंतर त्याचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. अजय अगदी साध्या लूकमध्ये दिसला आहे. त्याने गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि ट्राउजर घातली होती. हातात एक कागदही धरलेला दिसत आहे.
मोठा पडदा गाजवल्यानंतर अजय देवगण आता डिजिटल व्यासपीठावर धमाल करायला येत आहे. तो ‘रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ या गुन्हेगारीवर आधारित असलेल्या वेबसीरिजमधून ओटीटीवर पाऊल ठेवत आहे. ही वेबसीरीज हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. मुंबईतील बर्याच ठिकाणी याचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. बर्याच चित्रपटांमध्ये पोलिसांची भूमिका साकारणारा अजय देवगण आता एक नवीन आणि प्रखर पोलीस अधिकारी म्हणून दिसणार आहेत. या वेबसीरिजचे स्वरूप बरेच वेगळे असणार आहे. चाहते अजय देवगणच्या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अजय देवगणचा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपटही ओटीटी व्यासपीठावर प्रदर्शित होणार आहे. माध्यमांतील बातमीनुसार, हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. अजयसोबत सोनाक्षी सिन्हा देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.
अजय देवगणने डिसेंबरमध्ये आपल्या ‘मेडे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. या चित्रपटात अजयसोबत अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सगळीकडेच कोरोनामुळे कडक नियम असल्याने चित्रपटांचे शूटिंग बंद आहेत. जेव्हा शूटिंग करायला परवानगी मिळेल, तेव्हा या चित्रपटाचा काही भाग हा डोहा येते चित्रित केला जाणार आहे . तूर्तास सगळे कोरोना पूर्णपणे जाण्याची वाट बघत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-