कोरोनामुळे सगळीकडेच भयाण वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अशातच बॉलिवूडमध्ये पण याचा परिणाम होत आहे. गेल्या २० वर्षांपासून चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेले समीक्षक राजीव मसंद यांची प्रकृती गंभीर आहे. कोरोनानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, कारण आयसीयूमध्ये ठेवल्यानंतरही, त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग वाढला होता. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.
राजीव मसंद यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी पत्रकारिता सोडली, आणि करण जोहरच्या धर्म प्रॉडक्शन या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती.
Praying for you @RajeevMasand
????????????????????????????????— Swara Bhasker (@ReallySwara) May 3, 2021
करण जोहरच्या कंपनीचे सीओओ
येथे ते सीओओ म्हणून काम करत होते, आणि चित्रपटांचा सेटअप पाहत होते. डीसीए या नवीन कंपनीतही त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती, जिथे ते नवीन टॅलेंट लाँच करण्याचे काम करत होते. अलीकडेच डीसीएने चित्रपटांमध्ये अनेक नवीन चेहरे लाँच करण्यासाठी एक प्रकल्प सुरू केला होता, तृप्ती डिमरीपासून अनेक नवीन कलाकारांना चित्रपटांमध्ये भूमिका देण्याची घोषणा केली होती.
Sad news: Rajiv Masand, who has made a distinct identity as a popular film critic of Hindi films, has been admitted to Kokilaben Dhirubhai Ambani Hospital in Andheri, Mumbai due to being corona positive. Rajiv Masand, admitted in the ICU ward, is in critical condition. pic.twitter.com/TUXOCWO6LG
— Subhash Shirdhonkar (@4331Subhash) May 3, 2021
राजीव मसंद यांचे वय जास्त नाहीत, ते ४२ वर्षांचे आहेत, आणि त्यांनी अगदी लहान वयातच चित्रपट पत्रकारितेत, काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांची मेहनत पाहून त्यांना लवकरच संपादक करण्यात आले. त्यांनी आपला ‘मसंद की पसंद’ कार्यक्रम सुरू केला.
ज्यामध्ये ते चित्रपटांची समीक्षा करत असे, आणि त्यांचे चाहते जगभरात पसरलले आहेत. त्यांनी थोड्या काळात चित्रपट जगातील अव्वल समीक्षकाचा दर्जा प्राप्त केला आहे.
सर्वात लोकप्रिय चित्रपट समीक्षक
कदाचित बॉलिवूडचा असा कोणीही स्टार नसेल, ज्याने राजीव मसंद यांना मुलाखत दिली नसेल. राजीव यांच्या मुलाखतीत कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बर्याच गोष्टी सांगत असत.
फिल्मी जगाच्या नेटवर्कशी संबंधित जवळजवळ प्रत्येक व्यक्ती राजीव यांना ओळखते. राजीव यांच्या प्रकृतीची बातमी ज्यांनी ऐकली असेल, त्यांनी देवाकडे ते लवकरात लवकर बरे व्हावे, म्हणून प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे.
मोठे मुलाखतकार
चित्रपट पत्रकारांमध्ये राजीव मसंद हे एकमेव व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांच्या या कार्यक्रमातील लोकप्रियतेमुळे, त्यांना नेटफ्लिक्सवर मुलाखत करण्याची ऑफर मिळाली, पण राजीव हे करण जोहरच्या कंपनीत सामील झाले.
राजीव यांच्या शो राउंड टेबलमध्ये बॉलिवूड कलाकार आपली मते मांडत असत. बरेच कलाकार एकत्र येत असत, आणि मोठ्या विषयांवर वाद- विवाद करत असत. राजीव आधी चॅनेलसाठी काम करायचे, पण नंतर त्यांनी त्यांचे यूट्यूब चॅनलही सुरू केले.
शेवटच्या लॉकडाऊनमध्ये रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग या जवळपास प्रत्येक मोठ्या कलाकारांनी त्यांना मुलाखत दिली, आणि लॉकडाऊनमध्ये आपला वेळ कसा घालवला याबद्दल बरेच बोलले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-